एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
प्राची देसाईच्या डायलॉगसाठी राम कदमांनी गोविंदांना उतरवलं!
अभिनेत्री प्राची देसाईच्या डायलॉगसाठी आमदार राम कदमांनी दहीहंडी फोडण्यासाठी सर्वात वरच्या थरावर पोहचलेल्या गोविंदांना पुन्हा खाली उतरवलं.
मुंबई : भाजपचे आमदार राम कदम यांचा नवा प्रताप कॅमेरात कैद झाला आहे. अभिनेत्री प्राची देसाईच्या डायलॉगसाठी आमदार महाशयांनी हंडी फोडण्यासाठी सर्वात वरच्या थरावर पोहचलेल्या गोविंदांना पुन्हा खाली उतरवलं. मुंबईतील घाटकोपरमध्ये राम कदम यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात हा प्रकार घडला.
मालिका आणि चित्रपटांतून गाजलेली अभिनेत्री प्राची देसाईने राम कदमांच्या दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली होती. प्राचीला एखादा संवाद म्हणण्याची फर्माईश यावेळी करण्यात आली. तिने माईक हातात घेतला आणि तुम्हाला बघून मला 'बोलबच्चन' चित्रपटातला एक डायलॉग आठवला, असं म्हणत डायलॉग म्हणायला सुरुवात केली.
व्यासपीठावर डायलॉगबाजी आणि आगत-स्वागत सुरु असतानाच एक गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यासाठी थर लावत होतं. योगायोगाने प्राचीने डायलॉग म्हणायला सुरुवात केली, त्याचवेळी त्या पथकाने जवळपास आठ थर रचत दहीहंडीपर्यंत मजल मारली होती.
खरं तर, इतक्या मेहनतीने गोविंदा आठव्या थरावर पोहचले असताना प्राची देसाईला डायलॉग थांबवण्याची विनंती करणं सहज शक्य आणि व्यवहार्य होतं. किंबहुना ते अपेक्षित असताना राम कदमांनी उंचीवर गेलेल्या गोविंदांना थांबवलं.
'ए थांब थांब थांब.. फोडायची नाही. थांब. नितीन. त्याला खाली उतरव. खाली उतरव. फोडायची नाही. थांब, थांब, खाली उतरव. खाली उतरव. ए नितीन. मी सांगेन योग्य वेळेस. दोन मिनिटं थांब. खाली उतरा सगळे.' अशी दमबाजी राम कदमांनी करताच बिचारे गोविंदा निमूटपणे खाली उतरले. राम कदमांचा हा वायरल व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्याने तोंडात बोटं घातली आहेत.
पाहा व्हिडिओ :
दहीहंडी उत्सवातली मुक्ताफळं
तुम्हाला एखादी मुलगी पसंत असेल आणि तिचा लग्नाला नकार असेल, तर मला सांगा, मी त्या मुलीला पळवून आणण्यास मदत करतो, असं म्हणत भाजपचे आमदार राम कदम यांनी मुक्ताफळं उधळली होती. घाटकोपरमध्ये दहीहंडी उत्सवात राम कदम बोलत होते.
"कोणत्याही कामासाठी भेटू शकता. साहेब, साहेब मी तिला प्रपोज केलं, ती मला नाही म्हणते, प्लिज मदत करा. शंभर टक्के मदत करणार. आधी मी सांगेन तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या. जर आई-वडील म्हणाले की ही मुलगी मला पसंत आहे, तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा", असं राम कदम म्हणाले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement