एक्स्प्लोर

बेताल वक्तव्याबाबत राम कदमांकडून खेद व्यक्त, मात्र माफी नाहीच!

आपल्या बेताल वक्तव्याबाबत राम कदमांनी अद्यापही माफी मागितली नाही.

मुंबई : मुली पळवण्याच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत भाजप आमदार राम कदम यांनी ट्विटरवरुन खेद व्यक्त केला आहे. मात्र, आपल्या बेताल वक्तव्याबाबत राम कदमांनी अद्यापही माफी मागितली नाही. राम कदमांकडून खेद व्यक्त “कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, दुखावल्या असतील, तर मी खेद व्यक्त करतो. अर्धवट 54 सेंकंदांचं विधान काही विरोधकांनी पसरवून संभ्रम निर्माण केला दुसऱ्या दिवशी! आदल्या दिवशी दुपारी मीडिया पत्रकार उपस्थित होते. त्यांनी आक्षेप घेतला नाही, कारण त्यांनी संपूर्ण संभाषण ऐकले होते.”, असे राम कदम यांनी ट्वीट केले आहे. बेताल वक्तव्याबाबत राम कदमांकडून खेद व्यक्त, मात्र माफी नाहीच! दहीहंडीच्या कार्यक्रात राम कदम नेमकं काय म्हणाले होते? "कोणत्याही कामासाठी भेटू शकता. साहेब, साहेब मी तिला प्रपोज केलं, ती मला नाही म्हणते, प्लिज मदत करा. शंभर टक्के मदत करणार. आधी मी सांगेन तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या.  जर आई-वडील म्हणाले की ही मुलगी मला पसंत आहे, तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा", असं राम कदम म्हणाले. VIDEO : राम कदमांची मुक्ताफळं राम कदमांवर सर्वच स्तरातून टीका आमदार राम कदमांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका सुरु झाली आहे. “भाजपाचे आमदार राम कदम यांनी काल दहीहंडीत मुक्ताफळे उधळली आहेत. लग्नासाठी मुलींना पळवून नेण्याची विधाने करणारे राम कदम हे कोणत्या संस्कृतीचे प्रतिनिधी आहेत? इथून पुढे महाराष्ट्रात मुली पळवून नेण्याचे प्रकार झाले तर त्याचा पहिला गुन्हा राम कदमांवर दाखल करण्यात यावा.”, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. टाक घोड्यावर आणि ने वाड्यावर, असं करायला आमदार म्हणजे काही राजा नाही. आजचं राज्य हे लोकशाहीचं, कायद्याचं राज्य आहे. मुलीला पळवून आणण्याचं आमदारांचं वक्तव्य भीतीदायक आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली. “राम कदम यांच्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा नाही. लोकप्रतिनिधींनी बोलताना तारतम्य बाळगायला हवं. आपण काय करतोय, कुणासमोर बोलताय, उत्साहाच्या भरात काय बोलतोय याचं भान सत्ताधाऱ्यांना राहिलं नाही. आज महिलांची स्थिती बिकट आहे, त्या असुरक्षित आहेत. त्यात अशी वक्तव्य करुन राम कदमांना नक्की काय म्हणायचं आहे, हे त्यांनी स्पष्ट करावं”, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या. ‘माझा’चा महाराष्ट्राला शब्द! राम कदम जोपर्यंत बेताल वक्तव्याबद्दल महाराष्ट्राची माफी मागत नाहीत, तोपर्यंत ते एबीपी माझाच्या चर्चेत दिसणार नाहीत, अशी भूमिका एबीपी माझाने घेतला आहे. बेताल वक्तव्याबाबत राम कदमांकडून खेद व्यक्त, मात्र माफी नाहीच!

महत्त्वाच्या बातम्या

जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार

व्हिडीओ

Mumbai Highway Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget