एक्स्प्लोर

चांगल्या गोष्टीसाठी मित्राने केलेल्या स्पर्धेत गैर काय? : मुनगंटीवार

अयोध्येत राम मंदिर निर्माण व्हावं ही देशातल्या प्रत्येक हिंदूच्या मनातली भावना आहे. शरयूच्या काठावर आज उद्धव ठाकरे जी महाआरती करणार आहेत, त्याचा देशाचा नागरिक म्हणून मला आनंदच आहे, अशा भावना सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

मुंबई : एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी आपल्या मित्राने आपल्याशी स्पर्धा केली, तर त्यात गैर काहीच नसतं. राम मंदिर बांधण्याच्या हेतूने जर उद्धव ठाकरे अयोध्याला गेले असतील, तर त्यात गैर काहीच नाही. यात स्पर्धा किंवा कुरघोडीचा प्रश्नच येत नाही, असं भाजप नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. अयोध्येत राम मंदिर निर्माण व्हावं ही देशातल्या प्रत्येक हिंदूच्या मनातली भावना आहे. शरयूच्या काठावर आज उद्धव ठाकरे जी महाआरती करणार आहेत, त्याचा देशाचा नागरिक म्हणून मला आनंदच आहे, अशा भावना सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब अयोध्येला गेले आहेत. भाजपचा जो विचार आहे, तोच शिवसेनेचाही आहे. आमच्या विचारात समानता आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह ज्यासाठी आग्रही आहेत, तोच आग्रह उद्धव ठाकरेंचाही आहे, असं सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्ट केलं. 'पहले मंदिर, फिर सरकार' ही उद्धव ठाकरेंची भूमिका असू शकते. याचा अर्थ मंदिर बांधण्याचं काम लवकर सुरु व्हावं, निवडणुका घेऊ नये किंवा शिवसेना-भाजपने एकत्र येऊ नये, असा उद्धव ठाकरेंना अभिप्रेत नसावा, असा दावाही मुनगंटीवारांनी केला. प्रभू रामचंद्रच्या कृपेने आमच्यातील छोटे-मोठे मतभेदही दूर होतील. आधी जर युतीसाठी 'स्टेट हायवे' होता, तर आता अयोध्याच्या निमित्ताने 'राष्ट्रीय मार्ग' तयार होईल, अशी आशाही सुधीर मुनगंटीवारांनी व्यक्त केली. राम मंदिर हा मताचा विषय नाही, ती कोट्यवधी जनतेच्या मनाची आस्था आहे. निवडणुकीचा मुद्दा फक्त आणि फक्त विकासाचा असू शकतो. दीन-दुर्बलांना न्याय मिळावा, वंचितांना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य मिळावं, हा निवडणुकीचा मुद्दा असल्याचं मुनगंटीवार म्हणाले. राम मंदिर हा राजकारणाचा नाही तर राष्ट्रकारणाचा मुद्दा आहे. मंदिर हा एका पक्षाचा विषयच नाही, यासाठी सर्वपक्षीयांची बैठक घेऊन एकमत केले पाहिजे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी भावूक झाले. तर, मताचं राजकारण बाजूला ठेवून हिंदुत्वाच्या बाजूने जे येतील त्यांना सोबत घेऊ, असं वक्तव्य भाजपसोबत युतीबाबत बोलताना मनोहर जोशींनी केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवार महायुती सोडणार होते, अतुल लोढेंचं मोठं वक्तव्य, उमेश पाटील म्हणाले दाव्याचा ठोस पुरावा नेमका काय? 
अजित पवार महायुती सोडणार होते, अतुल लोढेंचं मोठं वक्तव्य, उमेश पाटील म्हणाले दाव्याचा ठोस पुरावा नेमका काय? 
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
मोठी बातमी, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेबर 2026 | बुधवार

व्हिडीओ

Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर, मुद्रा योजनेसाठी 5000 कोटींना मंजुरी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
Kavya Maran Marriage : काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, लग्नाचे फोटो शेअर करताच शुभेच्छांचा पाऊस
काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, रजनीकांत यांची हजेरी
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकसरीने वापरण्याचा दिला सल्ला
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकसरीने वापरण्याचा दिला सल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेबर 2026 | बुधवार
Gold Rate : भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे IBJA चे दर जाणून घ्या
भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या

Embed widget