एक्स्प्लोर

'धन्यवाद मोदीजी' अभियानाचा शुभारंभ, भाजप 15 लाख लाभार्थ्यांची आभाराची पत्रे पाठविणार

PM modi : लाभार्थ्यांकडून गोळा केलेली अशी पंधरा लाख पत्रे 15 नोव्हेंबरला नवी दिल्ली येथे पाठविणार आहे.

PM modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य लोकांसाठी केलेल्या योजनांचा लाभ झालेल्या राज्यातील लाभार्थ्यांशी संपर्क साधून त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेली पंधरा लाख पत्रे पंतप्रधानांपर्यंत पोहचविण्याचे भाजपचे ‘धन्यवाद, मोदीजी’ अभियान रविवारी सुरू झाले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या अभियानात मुंबईत गोरेगाव मतदारसंघात पन्नास लाभार्थ्यांशी संपर्क साधला. बावनकुळे यांनी 'धन्यवाद मोदीजी' या अभियानाची माहिती दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या सेवा पंधरवडा अभियानाचे प्रमुख प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर, उपाध्यक्ष कृपाशंकरसिंह, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, स्थानिक आमदार व माजी राज्यमंत्री विद्या ठाकूर, ‘धन्यवाद मोदीजी’ अभियानाच्या संयोजक प्रदेश सचिव श्वेता शालिनी आणि सहसंयोजक हर्षल विभांडिक उपस्थित होते.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सामान्य लोकांसाठी थेट लाभाच्या अनेक योजना सुरू केल्या व त्यांची यशस्वी अंमलबजावणी केली. घरकूल, शौचालय, वीज कनेक्शन, गॅस कनेक्शन, शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये, कोरोनाकाळात मोफत धान्य अशा विविध योजनांचे राज्यात पाच कोटी लाभार्थी आहेत. पहिल्या टप्प्यात त्यापैकी पंधरा लाख लाभार्थ्यांशी भाजपाचे कार्यकर्ते संपर्क साधणार असून त्यांच्या हस्ताक्षरातील पत्रे घेणार आहेत. लाभार्थ्यांकडून गोळा केलेली अशी पंधरा लाख पत्रे 15 नोव्हेंबरला नवी दिल्ली येथे पाठविणार आहे.

ते म्हणाले की, राज्यातील सर्व 97,000 बूथमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेल्या या अभियानात पक्षाचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी सहभागी होणार आहेत. प्रत्येक कार्यकर्ते पाच घरांमध्ये लाभार्थ्यांशी संपर्क साधून त्यांच्या हस्ताक्षरातील पत्रे घेणार आहे.

अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात फेब्रुवारी 2024 पर्यंत राज्यातील किमान दोन कोटी लाभार्थ्यांशी संपर्क साधण्याचे उद्दीष्ट आहे. एखाद्या घरात पात्र व्यक्तीला सरकारी योजनेचा अजून लाभ मिळाला नसल्याचे आढळले तर त्यांना तो लाभ मिळवून देण्यासाठीही कार्यकर्ते काम करतील, अशी माहिती त्यांनी दिली.

सरकारी कार्यालयात वंदे मातरम असे संबोधण्याच्या निर्णयाबद्दल आपण भाजपातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन करतो. मातृभूमीबद्दल प्रेम व्यक्त करण्याचा हा राष्ट्रीय उपक्रम आहे. हा भाजपाचा पक्षीय कार्यक्रम नाही. पक्षीय दृष्टीकोनातून राजकीय हेतूने काहीजण त्यावर टीका करत आहेत, त्यांना जनता माफ करणार नाही, असे बावनकुळे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

भाड्याने वाहन लावून देण्याचं आश्वासन, महिलेकडून तब्बल 33 लाखांची फसवणूक, दिंडोशी पोलिसांची मोठी कारवाई, आरोपीला मध्य प्रदेशातून अटक 
भाड्याने वाहन लावून देण्याचं आश्वासन, महिलेकडून तब्बल 33 लाखांची फसवणूक, दिंडोशी पोलिसांची मोठी कारवाई, आरोपीला मध्य प्रदेशातून अटक 
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Samadhan Sarvankar On Shivsena UBT Vishakha Raut: व्यवसाय मजूर-घरकाम...बाप रे?; विशाखा राऊतांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर समाधान सरवणकरांचा आणखी एक आरोप
व्यवसाय मजूर-घरकाम...बाप रे?; विशाखा राऊतांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर समाधान सरवणकरांचा आणखी एक आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवल जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवल जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
Embed widget