Ashish Shelar on Uddhav Thackeray: शिवसेनेत (Shiv Sena) उभी फूट पडली आणि राज्याच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली. काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगानं (Central Election Commission) शिवसेना नाव आणि पक्षाचं निवडणूक चिन्ह शिंदे गटाला (Shinde Group) दिलं आणि सर्वच स्तरांतून विविध प्रतिक्रिया समोर आल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या शिवसेनेबाबतच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यावर निशाणा साधला होता. ठाकरेंच्या याच टीकेला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देताना आशिष शेलार यांनी त्यांना डबक्यातल्या बेडकाची उपमा दिली आहे. तसेच, बेडकानं फुगायचा प्रयत्न केला की, तो फुटतो, उद्धवजी तुमची आज तीच अवस्था झालीये, असं म्हणत त्यांच्यावर निशाणाही साधला आहे. 


उद्धव ठाकरे सत्तापिपासू वृत्तीने वागले : आशिष शेलार


काल (रविवारी) पुणे दौऱ्यावर असणाऱ्या अमित शहांनी पुन्हा एकदा ठाकरेंवर निशाणा साधत 2014 मध्ये तुटलेल्या युतीचा पुनरुच्चार केला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही याचा समाचार घेते थेट शाहांवर टीकेचे बाण सोडले. तसेच, अमित शहांचा उल्लेख मोगॅम्बो असा केला. ठाकरेंच्या याच टीकेला प्रत्युत्तर देताना आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे सत्तापिपासू वृत्तीने वागले, असं म्हटलं आहे. तसेच, आमचे फोन घेतले नाहीत. स्वतःच्या विचारांना तिलांजली देऊन हिंदुत्व सोडून  हिंदुत्वाशी गद्दारी केली, असं म्हणत उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलं आहे.  


...ते डबक्यातले बेडूक, फुगायचा प्रयत्न केला, तरी फुटतो, उद्धवजी तुमची आज तीच अवस्था झालीये : आशिष शेलार 


"जे मोग्याम्बो म्हणतात, ते डबक्यातले बेडूक आहेत किती फुगलात तरी तुम्ही मोठे होऊ शकत नाही. बेडकानं फुगायचा प्रयत्न केला की, तो फुटतो, उद्धवजी तुमची आज तीच अवस्था झाली आहे.", असं म्हणत अमित शहांवर टीका करणाऱ्या ठाकरेंना आशिष शेलार यांनी खडे बोल सुनावले आहेत. 


पाहा व्हिडीओ : Ashish Shelar : ठाकरे हे डबक्यातले बेडूक, अमित शाहांवरच्या टीकेला शेलारांचं



काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? 


शिवसेनेत उभी फूट पडली आणि राज्याच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली. काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना नाव आणि पक्षाचं निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिलं आणि सर्वच स्तरांतून विविध प्रतिक्रिया समोर आल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या शिवसेनेबाबतच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. "मोगॅम्बो खुश हुआ" , असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता अमित शहांवर थेट तोफ डागली आहे. 


अमित शहा यांचं नाव न घेता उद्धव ठाकरे म्हणाले की, "काल पुण्यात कोणीतरी आलं होतं, त्यांनी विचारलं की महाराष्ट्रात काय चाललं आहे? पुढे ते हेदेखील म्हणाले, आजचा दिवस खूप चांगला आहे, कारण शिवसेनेचं नाव आणि चिन्ह आमच्यासोबत आलेल्या आमच्या गुलामांना देण्यात आलंय. त्यांनी (अमित शहा) खूप छान म्हटलं, 'मोगॅम्बो खुश हुआ".


मोगॅम्बोला हेच हवं होतं : उद्धव ठाकरे 


अमित शाह यांच्यावर निशाणा साधत उद्धव ठाकरे म्हणाले की, "हा मोगॅम्बो आहे. मिस्टर इंडिया हा चित्रपट तुम्हाला आठवत असेल, तर मोगॅम्बोलाही हेच हवं होतं. देशात भांडणं झाली पाहिजेत. लोक आपापसांत भांडत राहिले, तर मी राज्य करेन. आज तेच आहे. तेच मोगॅम्बोला हवंय." ते म्हणाले, "जे आमच्यासोबत आहेत, ते आमचे आहेत. मग तो हिंदू असो की, अन्य कोणी, याचा काहीच फरक पडत नाही." 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


संजय राऊतांच्या अडचणी पुन्हा वाढणार? मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल