Kirit Somaiya Viral Video:   भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ प्रकरणी आता मुंबई पोलीस (Mumbai Police) अॅक्शन मोडमध्ये आले आहे. किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणी मुंबई पोलिसांच्या मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Police Crime Branch) तपास सुरू केला आहे. 


एका वृत्तवाहिनीने सोमवारी, किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारीत केल्याने मोठी खळबळ उडाली होती. या व्हिडीओत सोमय्या हे  एका महिलेसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत असल्याचा दावा करण्यात आला होता. 
सोमय्या यांच्या व्हिडीओ प्रकरणाचे पडसाद आज विधिमंडळातही उमटले. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमय्यांवर गंभीर आरोप केले. आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरलचा मुद्दा विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही गाजला. या प्रकरणाची सखोल आणि उच्च स्तरावर चौकशी होईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली होती. फडणवीस यांनी चौकशीची घोषणा केल्यानंतर त्यावर कार्यवाही सुरू झाली आहे. मुंबई पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. मुंबई गुन्हे शाखा युनिट 10 व्हिडिओच्या सत्यतेचा तपास करणार आहे.  या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेचे अधिकारी तांत्रिक तज्ज्ञ आणि सायबर टीमची मदत घेणार आहेत.


माता भगिनींना त्रास देणाऱ्या किरीट सोमय्यांना सरकारं सुरक्षा देणार का? : अंबादास दानवे


विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडीओचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, "काही लोक ईडी सीबीआयच्या माध्यमातून विरोधी पक्षांतील नेत्यांना भीती दाखवतात आणि दुसरीकडे आपल्या केंद्रीय यंत्रणेत ओळखी असून महिलांशी संपर्क करत असल्याचं समोर आलं आहे. महामंडळात नियुक्त्या देतो, विधानपरिषदेवर घेतो असं सांगितलं जातं आणि एक्स्टॉर्शन केलं जातं. असच अनेक नेत्यांना देखील ईडी, सीबीआयचे धाक दाखवून पैसै मागितले जातात. अनेक महिलांनी मला येऊन माहिती दिली आहे. 8 तासांचे व्हिडीओ माझ्याकडे आहेत. ही व्यक्ती खंडणी उकळत असल्याचे आरोप केला. असे उपरे दलाल महाराष्ट्रात येतात आणि महिलांना त्रास देतात. किरीट सोमय्या त्यांचं नाव आहे. माता भगिनींना त्रास देणाऱ्या किरीट सोमय्यांना सरकार सुरक्षा देणार का? मी त्याचा पेन ड्राईव्ह आपल्याला देतो. हा माणूस पुन्हा मुंबई पोलिसांना पत्र लिहितो आणि चौकशी करा म्हणतो."


किरीट सोमय्या यांची सुरक्षा काढावी : अनिल परब


ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांची सुरक्षा काढण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, "काल एका चॅनलवर भाजपच्या माजी खासदारांचा व्हिडीओ समोर आला आहे. अंबादास दानवे यांनी सांगितलं की बदनामी काय असते तर मी त्याचा साक्षीदार आहे. मुलाबाळांना केंद्रीय यंत्रणा बोलावते आणि घाणेरडे प्रश्न विचारते. यामुळे प्रचंड बदनामी होत असते. ज्या खासदाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याने अनेकांचे आयुष्य बदनाम केले आहेत. माझी मागणी आहे की ईडी, सीबीआय नको थेट रॉची चौकशी मागे लावा. त्यांनी आज जे पत्र दिलं आहे त्यामध्ये त्यांनी हा व्हिडीओ खोटा आहे असं कुठेही म्हटलं नाही. त्यांनी म्हटलं आहे की मी कुणावर अत्याचार केला नाही याचा अर्थ हा व्हिडीओ खरा आहे. तात्काळ गृहमंत्र्यांनी किरीट सोमय्या यांची सुरक्षा काढावी."


इतर महत्त्त्वाच्या बातम्या: