Kirit Somaiya Viral Video : राज्यातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात आरोपांची राळ उठवणारे भाजप नेते किरीट सोमय्या आता चांगलेच अडचणीत आले आहेत. सोमवारी त्यांच्याशी संबंधित 36 क्लिप्स व्हायरल (Kirit Somaiya Viral Video) झाल्या आणि महाराष्ट्रात एकच खळबळ उठली. आता त्या क्लिप्स व्हायरल करण्यामागे नेमकं कोण आहे याची माहिती अद्याप समोर आली नाही, पण त्यामुळे भाजप आणि किरीट सोमय्या मात्र बॅकफूटवर गेले आहेत हे नक्की.
काँग्रेसच्या दिग्विजय सिंह यांचे फोटो व्हायरल (Digvijaya Singh Viral Video)
पण आपल्या देशात अशा स्कॅन्डलमध्ये अडकलेले किरीट सोमय्या हे काही पहिले नेते नाहीत. अशा क्लिप्सनी भूतकाळात अशा अनेक दिग्गजांचं करियर उद्ध्वस्त केलं आहे. त्यातलं पहिलं नाव होतं काँग्रेस नेते दिग्विजय सिंह.
सन 2014 मध्ये दिग्विजय सिंह यांचे काही आक्षेपार्ह फोटो लीक झाले होते. एका पत्रकार महिलेसोबत त्यांचे फोटो व्हायरल झाले. फक्त फोटोच नाही तर चुंबनाचे काही व्हिडीओही सार्वजनिक झाले. पण व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दिग्विजय सिंह
यांनी प्रेमाची कबुली दिली आणि एका वर्षानंतर त्या दोघांनी लग्न केलं.
काँग्रेसचे अभिषेक मनू सिंघवी यांचा व्हिडीओ व्हायरल (Abhishek Manu Singhvi Viral Video)
या यादीतील दुसरं नाव म्हणजे काँग्रेसचे दिग्गज नेते अभिषेक मनू सिंघवी. 2012 मध्ये अभिषेक मनू सिंघवी यांचा एक सेक्स व्हिडीओ व्हायरल झाला. सुप्रीम कोर्टच्या कॅम्पसमधील त्यांच्या ऑफिसमध्ये एका महिला वकिलासोबतचा हा सेक्स व्हिडीओ होता. त्या महिला वकिलाला जज बनवण्याचं आमिष त्यांनी दाखवल्याचीही चर्चा होती.
भाजपचे एनडी तिवारी (N D Tiwari Viral Video)
यातलं तिसरं मोठं नाव आहे एनडी तिवारी. 2009 साली एनडी तिवारींचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आला. तीन महिलांसोबतचा त्यांचा हा व्हिडीओ होता. एका तेलगु चॅनेलने हा व्हिडीओ समोर आणला होता. याच व्हिडीओमुळे एनडी तिवारींना राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा लागला.
गुजरातचे भरत सोळंखी (Bharat Solankhi Viral Video)
यातलं पुढचं नाव आहे गुजरात काँग्रेसचे नेते भरत सोळंकी. भरतसिंह सोळंकी हे गुजरातचे काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री होते. एका महिलेसोबतचा त्यांचा प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ त्यांच्याच पत्नीने रेकॉर्ड केल्याचं बोललं जातं.
कर्नाटक भाजपचे रमेश जारकीहोळी (Ramesh Jarkiholi Viral Video)
या यादीतलं शेवटचं नाव आहे ते कर्नाटकचे माजी मंत्री आणि भाजप नेते रमेश जारकीहोळी. रमेश जारकीहोळी हे कर्नाटकमधले भाजपचे आमदार आहेत. 2 मार्च 2019 रोजी त्यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला. नोकरी देण्याच्या बदल्यात त्या महिलेसोबत संबंध ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर होता. याप्रकरणानंतर जारकीहोळी यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.
महाराष्ट्रातही धनंजय मुंडे, राहुल शेवाळे अशा अनेकांना या प्रकारांना सामोरं जावं लागलंय. राजकारणी तर कायमच अशा जाळ्यांमध्ये अलगद अडकतात. त्यामुळे अशा नेत्यांचे कच्चे दुवे ओळखून त्यांच्या भोवती षडयंत्राचा फास टाकण्याचं लोण हे काही आजचं नाही. फक्त सूड उगवण्यासाठी अशा सेक्स टेप्सचा वापर होणं आणि त्याचा पायंडा पडणं हे एकंदरित राजकारणासाठीच घातक आहे.
ही बातमी वाचा: