Kirit Somaiya On BMC :  भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज लालबागच्या राजाचे (Lalbaug Raja) दर्शन घेतले. यावेळी किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेतील (Mumbai Mahapalika) भ्रष्टाचारावरुन पालिकेतील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले की,  नोएडातील भ्रष्टाचाराचे ट्विन टॉवर पाडले.   महाराष्ट्रातील अनिल परब (Anil Parab) यांच्या भ्रष्टाचाराचे स्मारक असलेला त्यांचा रिसॉर्ट पाडण्याची शक्ती बाप्पाने द्यावी अशी प्रार्थना केली. मुंबई महानगरपालिकेतील (BMC) माफिया सरकार जावे यासाठीही बाप्पाकडे प्रार्थना केली आणि बाप्पाही माझ्याकडे बघून हसले, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली. 


मुंबई आणि परिसरातील अनधिकृत बांधकामांबाबत प्रश्न


किरीट सोमय्या यांनी गेल्या आठवड्यातच पत्रकार परिषद घेत मुंबई आणि परिसरातील अनधिकृत बांधकामांबाबत प्रश्न उपस्थित केले होते. 25 हजारहून अधिक भाडेकरू, घरमालक घरांना ओसी प्रमाणपत्र नसल्याने चिंतेत आहेत. अनेक टॉवर्सलादेखील ओसी प्रमाणपत्र नाही. काही मजले बेकायदेशीरपणे उभारण्यात आले असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. या अनधिकृत बांधकाम प्रकरणी 25 हजारांहून अधिक सदनिकाधारकांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती. 


दिवाळीपर्यंत अनिल परबांचा रिसॉर्ट तुटणार


अनिल परब यांच्या मालकीचा रिसॉर्ट तोडकामासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सोमय्यांनी सांगितले होते. गणेशोत्सवा दरम्यान कंत्राटदार नेमण्यात येणार असून  दिवाळीपर्यंत अनिल परबांचा रिसॉर्ट तुटणार असल्याचा दावा सोमय्यांनी केला. नोएडातील ट्वीन टॉवर 12 सेकंदात पाडण्यात आले. अगदी तशाच प्रकारे अनिल परब यांचं हे रिसॉर्टदेखील 12 सेकंदात उद्धवस्त झाले पाहिजे. यामुळे भ्रष्ट मंत्र्यांना एक धडा असेल असेही सोमय्यांनी म्हटले होते.


किशोरी पेडणेकरांनाही दिला होता इशारा


किरीट सोमय्या यांनी माजी महापौर किशोरी पेडणेकरांवर देखील आरोप केला होता. किशोरी पेडणेकर यांनी जवळपास सहा बेनामी गाळे घेतले आहेत. त्याबाबत पुन्हा एकदा पाठपुरावा करणार असल्याचे सोमय्यांनी म्हटले. किशोरी पेडणेकर यांनी वरळीत बेनामी गाळे खरेदी केले असल्याचे सोमय्यांनी सांगितले होते.


इतर महत्वाच्या बातम्या


Kirit Somaiya : नोएडातील अनधिकृत टॉवर तुटला, मुंबईतील अनधिकृत इमारतींचे काय? सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र


Kirit Somaiya On Anil Parab : गदा आणि हातोडा घेवून ट्विन रिसॉर्ट दिवाळी पर्यंत जमीनदोस्त करणार