एक्स्प्लोर
युतीबाबत शिवसेनेला चर्चेसाठी निमंत्रण देणार : शेलार
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीसाठी हात पुढे केल्यानंतर, भाजपही सकारात्मक आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी याबाबतची माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' बंगल्यावर आज भाजपची बैठक झाली. त्यानंतर आशिष शेलार यांनी ही माहिती दिली. या बैठकीला मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंसह भाजपचे नेते उपस्थित होते.
"युतीबाबत भाजपने सकारात्मक भूमिका घेतली आहे.
युतीबाबत चर्चेसाठी शिवसेनेला निमंत्रण देऊ.
आजपासून चर्चेला सुरुवात होईल"असं आशिष शेलार यांनी सांगितलं.
आशिष शेलार म्हणाले की, "युतीची चर्चा लवकर झाली पाहिजे. भाजपने शिवसेनेच्या अपेक्षेला सकारात्मक प्रतिसाद देण्याचं ठरवलं आहे. म्हणून युतीच्या चर्चेसाठी शिवसेनेला निमंत्रण देण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. चर्चा करण्याबद्दलची इत्यंभूत माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे देणार आहेत. या चर्चेत मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती आणि जागावाटपाचा मुद्दा प्रमुख असेल. युतीबाबत भाजपची भूमिका सकारात्मक आहे. मुंबई मनपासाठी युतीबाबतच्या चर्चेला आजपासून सुरुवात होणार आहे." तसंच आकड्यांच्या खेळात आता पडणार नाही. जागा किती लढाव्या यापेक्षा मुंबईचा कारभार पारदर्शी करणं, हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचं आशिष शेलार यांनी सांगितलं. पाहा व्हिडीओअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement