एक्स्प्लोर
शिवसेनेतही गुन्हेगारांचं इनकमिंग सुरु, आर्थिक फसवणूक करणाऱ्याचा पक्षप्रवेश

मुंबई : भाजपमध्ये काल पुण्यात गुंड विठ्ठल शेलार याने प्रवेश केला. त्यानंतर आता शिवसेनेतही लोकांची आर्थिक फसवणूक केलेल्या गुन्होगाराला प्रवेश देण्यात आला आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे मुलुंडचे गुजराती नेते भारत धनानी याने प्रवेश केला. भारत धनानीने माझगावमधील कच्छी लोहाना ट्रस्ट मधील 250 लोकांची करोडो रुपयांची आर्थिक फसवणूक केली असल्याचा आरोप स्थानिक रहिवाश्यांनी केला आहे. या संदर्भात जयेश कोटक यांनी माहीतीच्या अधिकारात सर्व भ्रष्टाचार बाहेर काढला आणि भायखळा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. सध्या कोर्टात ही केस सुरू आहे. गुंडांना पक्षात घेतल्यावरुन आतापर्यंत भाजपला टार्गेट केलं जात होतं आणि विशेष म्हणजे टीका करणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे नेतेही होते. मात्र, आता थेट शिवसेनेतच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना प्रवेश दिला जातो आहे. त्यामुळे आता शिवसेनेवर विरोधकांकडून टीका सुरु होण्याची शक्यता आहे.
Before You Go
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली






















