एक्स्प्लोर
मुंबईकरांचा प्रवास महागण्याची शक्यता, बेस्टचा भाडेवाढीचा प्रस्ताव
मुंबई : बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी बेस्टच्या किमान भाडेवाढीचा पर्याय सुचवण्यात आला आहे. बेस्टच्या कृती आराखड्यावर चर्चा करण्यासाठी पालिका गटनेत्यांची आज बैठक झाली. या बैठकीत बेस्टच्या भाडेवाडीवर चर्चा करण्यात आली.
बेस्टचं किमान भाडं सध्या 8 रुपये आहे. मात्र आर्थिक संकटात असलेल्या बेस्टला बाहेर काढण्यासाठी किमान भाडं 2 रुपयांनी वाढवण्याची सूचना करण्यात आली आहे. आजच्या बैठकीत बेस्टच्या भाडेवाढीवर चर्चा झाली असली तरीही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.
बेस्टच्या भाडेवाढीसह आस्थापना खर्चातही कपात करण्याची सूचना करण्यात आली आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय बेस्ट समितीच्या बैठकीत घेण्यात येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement