एक्स्प्लोर
VIDEO: नवी मुंबईत बेस्ट बस आणि कारचा भीषण अपघात

नवी मुंबई : नवी मुंबईतल्या वाशीतील सेक्टर 17 मध्ये सकाळी 8 वाजताच्या सुमारास बेस्ट बस आणि फोक्सवॅगन कारचा भीषण अपघात झाला. सुदैवानं या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. पण हा अपघात एवढा भीषण होता की बसमधील ड्रायव्हर थेट रस्त्यावर फेकल्या गेला. त्यामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र चालक आणि वाहक किरकोळ जखमी झाला आहे. तुर्भेवरुन वाशी डेपोला जाणारी बेस्टची ही बस सिग्नल तोडून जात होती. त्याचवेळी कोपरीवरुन येणाऱ्या वाहनांसाठी सिग्नल सुटल्यानं फोक्सवॅगन कार भरधाव आली, आणि बसला जोरदार धडक दिली. या जोरदार धडकेमुळे बसची दिशा बदलून थोडी पुढे जाऊन बस रस्त्याच्या शेजारी असलेल्या एका दुकानाला धडकली. या बसमध्ये कोणीही प्रवासी नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. पण या अपघातात बस ड्रायव्हर गाडीच्या बाहेर फेकला गेला. तर कारमध्ये एअर बॅग असल्यानं कारचालकही किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान, या दोघांवरही अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. पण बसचालक सिग्नल तोडून जात असल्याने हा भीषण अपघात झाल्याचं बोललं जात आहे. अपघाताचा व्हिडीओ पाहा
Before You Go
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून






















