एक्स्प्लोर

आझाद मैदान दंगलीचा आरोपी शब्बीर खानने वांद्रे झोपडपट्टी पेटवली!

निर्मलनगर पोलिसांनी शब्बीर खान या 29 वर्षीय तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबई: वांद्रे स्टेशनच्या पूर्वेकडील बेहरामपाडा झोपडपट्टीत आग लावणारा मास्टरमाईंड सापडला आहे. निर्मलनगर पोलिसांनी शब्बीर खान या 29 वर्षीय तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक म्हणजे अटक केलेला आरोपी आणि त्याचे साथीदार हे आझाद मैदान हिंसाचारातील आरोपी आहेत. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाची गुरुवारी दुपारी अनधिकृत झोपड्यांवर कारवाई सुरु होती. त्याचवेळी साडे तीनच्या सुमारास झोपड्यांना आग लागली होती. या आगीत शेकडो झोपडपट्ट्या जळून खाक झाल्या. अतिक्रमण कारवाईवेळी अनेकवेळा आग लागल्याच्या घटना यापूर्वी घडल्या होत्या. त्यामुळे ही आगही लागली की लावली याबाबत तर्क-वितर्क लढवले जात होते. अखेर पोलिसांनी अधिक तपास करुन शब्बीर खानला अटक केली. शब्बीर खानने अतिक्रमण कारवाई थांबवण्यासाठी आग लावल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाची गुरुवारी दुपारी अनधिकृत झोपड्यांवर कारवाई सुरु होती. दुपारी अधिकारी-कर्मचारी जेवायला गेले, त्यावेळी  शब्बीर आणि त्याच्या साथीदारांनी झोपड्यांच्या छतावर रॉकेल ओतलं आणि एका झोपडीतील सिलेंडर उघडून दिलं. त्यामुळे ही झोपडी पेटली आणि त्यापाठोपाठ आगीने पेट घेतल्याने आग भडकली. सूत्रांच्या मते, शब्बीर हा अवैध झोपड्या बनवून विकण्याचं काम करतो. अतिक्रमण कारवाईवेळी आग लावण्यामागचा त्यांचा हेतूही अजब होता. आगीत झोपड्या वैध असल्याची कागदपत्र जळल्याचं त्यांना भासवायचं होतं. त्यामुळे आपल्याला पुन्हा झोपडी बनवता येईल, असा शब्बीर आणि त्याच्या सहकाऱ्यांचा मानस होता. आझाद मैदान दंगलीतील आरोपी दरम्यान शब्बीर खान हा मुंबईत 2012 मध्ये झालेल्या आझाद मैदान दंगलीतील आरोपी आहे. शब्बीरवर अनेक गुन्हे दाखल आहेत. शब्बीरसह आग लावणारे 6 आरोपी आहेत ज्यांच्यावर आझाद मैदान दंगलीचा आरोप आहे.  शब्बीरच्या दहा साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.
 दरम्यान शब्बीरला पोलिसांनी कोर्टात हजर केलं असता, त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आझाद मैदान दंगल काय होती? 11 ऑगस्ट 2012 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर दंगल झाली. म्यानमारमधील मुस्लीम समाजावर होणाऱ्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी रझा अकादमीने भेंडी बाजार ते आझाद मैदान असा मोर्चा काढला होता.
मोर्चेकरांची संख्या कमी असल्याची माहिती होती. त्यामुळे त्यानुसार पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. मात्र संख्या वाढत गेली आणि परिस्थिती पोलिसांच्या हाताबाहेर गेली. त्यात मोर्चातील जमावातून दगडफेक सुरु झाली. जमावावर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना कठीण होऊन बसलं आणि या सर्व प्रकारचं रुपांतर दंगलीत झालं.
या दंगलीत अनेक पोलिस जखमी झाले. शिवाय, सरकारी मालमत्तेसह प्रसारमाध्यमांच्या वाहनांचंही मोठं नुकसान झालं.या दंगलप्रकरणी 63 जणांना अटक करण्यात आली होती. मात्र पुढे पुराव्याअभावी पाच जणांची सुटका झाली. शिवाय 45 जणांना कोर्टाने जामीन मंजूर केला.
आझाद मैदान मोर्चाविरुद्ध मनसेचा मोर्चा
आझाद मैदान दंगलीचा निषेध सर्वच पक्षांनी केला. मात्र राज ठाकरेंच्या नेतृत्त्वा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढत, तत्कालीन पोलिस आयुक्त आरुप पटनायक यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती. त्यानंतर आरुप पटनायक यांची बदली झाली आणि त्यांच्या ठिकाणी म्हणजे मुंबई पोलिस आयुक्तपदी सत्यपाल सिंह यांची वर्णी लागली. त्यावेळीही राज ठाकरेंनी सत्यपाल सिंह यांची भेट घेऊन, आझाद मैदान दंगलीनंतर खालावलेल्या पोलिसांचं मनोबल उंचावण्यासाठी पावलं उचलण्याची विनंती केली होती.
संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

चाळीतून थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप! मुंबईच्या मुलांची भूतानमध्ये ऐतिहासिक कामगिरी; रविंद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक
चाळीतून थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप! मुंबईच्या मुलांची भूतानमध्ये ऐतिहासिक कामगिरी; रविंद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक
Vishakha Raut : विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
Vishakha Raut : उद्धव ठाकरेंना बीएमसीत मोठा धक्का, नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपदही धोक्यात
उद्धव ठाकरेंना बीएमसीत मोठा धक्का, नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपदही धोक्यात
Mumbai Ganeshotsav 2026 Local Train And Metro: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश
गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget