एक्स्प्लोर

देवेंद्र फडणवीस यांनी राईचा पर्वत करण्याची आपली सवय सोडावी : बाळासाहेब थोरात

आमच्या नेत्यांबद्दल अनादर खपवून घेणार नाही असा इशारा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे.

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राईचा पर्वत करण्याची आपली सवय सोडावी. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करुन आपल्या पक्षाने गमावलेली प्रतिमा सावरण्यासाठी भारतरत्न इंदिरा गांधी यांचा अवमान करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये, असा टोला काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करुन लगावला आहे. संजय राऊत यांचे वक्तव्य चुकीचं होतं, त्यावर आमची नाराजी होती. आम्ही ती उद्धव ठाकरे यांना कळवली. भारतरत्न दिवंगत इंदिरा गांधी यांच्या संदर्भातील विधान संजय राऊतांनी मागे घेतले आहे. त्यामुळे वादावर पडला आहे, असंही थोरातांनी स्पष्ट केलं. पण भविष्यात त्यांनी विचारपूर्वक विधाने करावीत. आमच्या महान राष्ट्रीय नेत्यांबद्दलचा तथ्यहीन अनादर काँग्रेस खपवून घेणार नाही, हे सर्वांनीच लक्षात ठेवावे, असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. दिवंगत इंदिरा गांधी या देशाच्या महान नेत्या होत्या. 1975 सालामध्ये मुंबईतील व देशातील गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्याचे काम त्यांनी केले. मुंबईतील स्मगलरांचे रॅकेट त्यांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केले. ज्या करीम लाला बद्दल बोललं जातंय त्याच्यासकट हाजी मस्तान युसुफ पटेल सारख्या अनेक गुन्हेगारी जगताशी संबंधित व्यक्तींना जेलमध्ये टाकून त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली. सोबतच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा या शासकीय निवासस्थानी कुख्यात गुंडाला भेटल्याची छायाचित्रे महाराष्ट्राने पाहिली आहेत. आपल्या सत्ताकाळात मुन्ना यादव सारख्या गुंडांची महामंडळावर नियुक्ती करुन त्याला संरक्षण देणाऱ्या फडणवीसांनी राजकारणातील गुन्हेगारी बाबत बोलू नये. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राईचा पर्वत करण्याची आपली सवय सोडावी. छत्रपती शिवरायांचा अपमान करून आपल्या पक्षाने गमावलेली प्रतिमा सावरण्यासाठी भारतरत्न दिवंगत इंदिराजी गांधी यांचा अवमान करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या लोकांना आता त्यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही. राऊत काय म्हणाले? पुण्यातील लोकमत वृत्तपत्राच्या कार्यक्रमात पत्रकारितेबाबत आपले अनुभव शेअर करताना संजय राऊत म्हणाले होते की, 'आज अंडरवर्ल्डमध्ये चिंधीगिरी होत आहे. आम्ही ते अंडरवर्ल्ड पाहिलं आहे, ज्यावेळी डॉन हाजी मस्तान मंत्रालयात जात होता. त्यावेळी लोक त्याच्या स्वागतासाठी बाहेर येऊन उभे राहत असत. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधीदेखील मुंबईचे डॉन करीम लाला यांना पायधुनी येथे भेटत असतं.' पुढे बोलताना ते म्हणाले की, 'मी अशी व्यक्ती आहे जिने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला देखील दम दिला होता.' राऊतांचे स्पष्टीकरण - संजय राऊत यांच्या वक्तव्याने वाद निर्माण झाल्याने त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 'करीम लालाची भेट सर्व राष्ट्रीय नेते घेत असत. ते अफगाणिस्थानाहून आलेल्या पठाणांचे नेते होते. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते त्यांची भेट घेत असतं.' राऊत म्हणाले की, 'इंदिरा गांधीही एक पठाण नेता म्हणूनच त्याला भेटत असत. करीम लाला याच्या ऑफिसमध्ये अनेक नेत्यांचे फोटोही लावलेले होते. खान अब्दुल गफार खान यांच्यासोबत करीम लाला काम करत होता.' संबंधित बातम्या - Sanjay Raut | काँग्रेस नेत्यांच्या आक्षेपानंतर संजय राऊतांकडून इंदिरा गांधींबद्दल वक्तव्य मागे | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget