एक्स्प्लोर
'सपा'च्या उमेदवार आयेशा शेख यांचा पैसे वाटतानाचा व्हिडिओ व्हायरल
मुंबई : समाजवादी पक्षाच्या उमेदवार आयेशा शेख या मतदारांना पैसे वाटतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आयेशा शेख या वॉर्ड क्रमांक 135 च्या समाजवादी पक्षाच्या उमेदवार आहेत.
व्हिडीओमध्ये आयेशा या मतदारांना पंधरा हजाराची रोकड स्वतःच्या हाताने देताना दिसत आहेत. शिवसेनेच्या प्रवक्त्या निलम गोऱ्हे यांनी या व्हिडीओ प्रकरणी निवडणूक आयोग आणि सह पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
निलम गोऱ्हे यांच्या तक्रारीनुसार आयेशा शेख यांच्यावर मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी देवनार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर आयेशा शेख अडचणीत येण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement