एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ठाण्याच्या पारसिक बोगद्याजवळ रेल्वेतील महिला प्रवाशांवर हल्ले
पारसिक बोगद्यातून लोकल ठाण्याकडून मुंब्र्याकडे येत असताना काही तरुण महिलांवर दगड आणि इतर जड वस्तू भिरकवतात. हे तरुण स्थानिक असल्याचा अंदाज आहे.
ठाणे : मुंब्र्याच्या पारसिक बोगद्याजवळ लोकलने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांवर हल्ले होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
पारसिक बोगद्यातून लोकल ठाण्याकडून मुंब्र्याकडे येत असताना काही तरुण महिलांवर दगड आणि इतर जड वस्तू भिरकवतात. हे तरुण स्थानिक असल्याचा अंदाज आहे. अशाच हल्ल्यात डोंबिवलीच्या विद्या कोळी या महिला प्रवासी जखमी झाल्या आहेत.
कोळी या एमटीएनएलमध्ये नोकरी करत असून मंगळवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे कामावरून घरी परतण्यासाठी त्यांनी दादरहून 5 वाजून 40 मिनिटांची बदलापूर फास्ट लोकल पकडली. ही लोकल ठाण्याहून सुटल्यानंतर पारसिक बोगद्याजवळ येताच अचानक काहीतरी अवजड वस्तू महिलांच्या डब्याच्या दिशेनं भिरकावण्यात आली. ही वस्तू दरवाज्यात उभ्या असलेल्या विद्या कोळी यांच्या पायावर लागली आणि त्या जखमी झाल्या. सुदैवाने इतर महिला प्रवाशांनी त्यांना आत ओढल्यानं त्या खाली पडल्या नाहीत.
या हल्ल्यात कोळी यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून पायात रॉड टाकावा लागला. त्यांच्यावर सध्या डोंबिवलीच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवाय अशाचप्रकारे आणखी एका तरुणीलाही बाटली फेकून मारल्याचा प्रकार घडला असून तिच्याही चेहऱ्याला यात दुखापत झाल्याची माहिती समोर आली. या प्रकारामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या महिला प्रवासी मात्र धास्तावल्या असून या भागात रेल्वे पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी महिला प्रवाशांमधून व्यक्त होते आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
क्रीडा
निवडणूक
Advertisement