एक्स्प्लोर

Aryan Khan : जामीनातील काही अटीशर्ती शिथिल करा; आर्यन खानची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

Aryan Khan : कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्स प्रकरणाचा तपास एसआयटीकडे असताना दर शुक्रवारी एनसीबीच्या मुंबई कार्यालयात हजेरीची गरज काय?, असा सवाल या याचिकेत करण्यात आला आहे. 

मुंबई : कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्स प्रकरणी जामीन मंजूर करण्यात आलेला सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खाननं शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा एकदा याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी हायकोर्टानं जामीनासाठी घातलेल्या काही अटींशर्तींमध्ये शिथिलता आणावी अशी मागणी आर्यनकडून या अर्जाद्वारे करण्यात आली आहे.

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया आलिशान क्रूझवर 2 ऑक्टोबर रोजी एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले. त्यात सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा आणि अन्य 20 जणांना अटक करण्यात आली. आर्यनसह अरबाज आणि मुनमुन धमेचाच्यावतीनं सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली होती. या दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी 28 ऑक्टोबर रोजी कठोर अटीशर्तींसह या तिघांना जामीन मंजूर केला. त्यातील एका अटीनुसार, आर्यनला एनसीबीच्या मुंबईतील कार्यालयात दर शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हजेरी लावणं बंधनकारक आहे. प्रामुख्यानं त्या अटीमध्ये शिथिलता आणण्याची मागणी आर्यनकडून या अर्जाद्वारे करण्यात आली आहे. 

सदर प्रकरणाचा तपास हा आता एनसीबीच्या विशेष तपास पथकाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. त्यामुळे आता आर्यनच्या एनसीबीच्या मुंबईतील कार्यालयातील हजेरीत शिथिलता आणावी. तसेच दर शुक्रवारी मुंबईतील एनसीबी कार्यालयात जाताना कार्यालयाबाहेर प्रसारमाध्यमं मोठ्या संख्येने उपस्थित राहत असल्यानं पोलीस आरोपींवर अरेरावी करत असल्याचा दावाही आर्याननं या अर्जातून केला आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन आर्यनला दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजर राहण्याच्या अटीत शिथिलता आणण्याची मागणी या अर्जातून करण्यात आली आहे. या अर्जावर पुढील आठवड्यात न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार

व्हिडीओ

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला

Embed widget