Aryan Khan Cruise Drug Case : मुंबई ड्रग्स प्रकरणी आर्यन खानचा जामीन अर्ज आज, बुधवारी न्यायालयाने फेटाळला. निकालाची प्रत मिळाल्यानंतर हायकोर्टात आव्हान देणार असल्याचं आर्यनच्या वकिलानं सांगितलं आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयात दोन्ही बाजूनं युक्तीवाद झाला, त्यावरून निर्णय झाला पाहीजे. मात्र, आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचं सांगत जामीन मिळून दिला जात नाही, असे नवाब मलिक म्हणाले. यावेळी नवाब मलिक यांनी वर्षभरातील एनसीबीनं केलेल्या सर्व कारवायांची न्यायिक चौकशी करण्यात यावी, त्यामधून सत्य बाहेर येईल, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे.  कोर्टात झालेल्या युक्तीवादावरुन निर्णय व्हायला हवा. मात्र, आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचं सांगत जामीन फेटाळला. लोकांना जास्त त्रास कसा द्यायचा आणि जामीन मिळवून द्यायचा नाही, असं सुरु आहे. काही जणांना जामीन मिळू देण्यासाठी अटाहास करायचा आणि काही ना जामीन मिळू द्यायचा नाही. जे सर्व काही पुरावे आहेत ते समीर वानखेडे यांच्या कार्यालयातील आहे. क्रूझवर काहीही आढळलं नाही. एनसीबीच्या 90 टक्के केसेस फेक आहेत. राजकीय हितासाठी वापर सुरु आहे. प्रसिद्ध लोकांना अडकवून खंडणी गोळा करण्याचं काम एनसीबी करत आहे. चौकशीसाठी जनहित याचिका दाखल करणार आहे, असं नवाब मलिक म्हणाले. 

एप्रिलमध्ये वर्सोवा येथे एक तक्रार दाखल झाली आहे. समीर वानखेडे यांच्या नावाखाली पैसे उकळलेले जात असल्याची तक्रार आहे. याची चौकशी झाल्यानंतर सर्व काही समोर येईल. भाजप, एन.सी.बी आणि काही गुन्हेगार लोक दहशत माजवत आहेत. पुढील आठवड्यात मी हे सर्व समोर आणणार आहे. त्यात माझ्याकडे काही पुरावे ही आहेत, असेही मलिक म्हणाले. 

हेही वाचा :

फ्लेचर पटेल आणि लेडी डॉन कोण? NCBच्या तीन केसेसमध्ये फ्लेचर पटेल पंच! नवाब मलिकांचे समीर वानखेडेंना पुन्हा सवालNCB ला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळत नाही, लोकांना बदनाम करण्याचं काम सुरु : नवाब मलिकNawab Malik On NCB : क्रुझवरील पार्टीतून पकडलेल्या भाजप नेत्याच्या मेहुण्याला सोडलं, समीर वानखेडेंचे कॉल रेकॉर्ड तपासावे : नवाब मलिक