मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक  (Nawab Malik) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात पुन्हा एनसीबीवर (NCB) गंभीर आरोप केले आहेत. नबाव मलिक म्हणाले की, मी आर्यन खानला अटक केल्यानंतर दोन आरोपी कसे हँडल करताय प्रश्न विचारले होते?  एससीबी कार्यालयात जातात कसे याबाबत प्रश्न विचारल्यानंतर एनसीबीने त्याबाबत खुलासा केला होता. फ्लेचर पटेल कोण आहेत? त्यांच्यासोबत झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंचा काय संबंध आहे?  त्यांच्या कुटुंबियासोबत माय लेडी डॉन सिस्टर अशा कॅप्शन फोटो ते टाकतात?  याबाबत मी ट्वीटरवर फोटो टाकले आहेत. हा फ्लेचर पटेल एनसीबीने तीन केसेसमध्ये पंच आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.






एनसीपी विरुद्ध एनसीबी; कुणाच्या बोलण्यावरून 'हा' अधिकारी धाडी टाकतो, वेळ आली की सगळं बाहेर काढणार : नवाब मलिक


त्यांनी सांगितलं की,  25 नोव्हेंबर  2020 साली सर्च ऑपरेशन  करण्यात आले  त्यात फ्लेचर पटेल पंच आहेत.   9 नोव्हेंबर  2020 रोजी करण्यात आलेल्या छापेमारीतही फ्लेचर पटेल पंच आहेत.  तसंच 2 जानेवारी  2021 रोजी करण्यात आलेल्या सर्च ऑपरेशनमध्येही फ्लेचर पटेल  पंच आहे.  तुमचे फॅमिली फ्रेन्ड पंच आहेत. मग हे ठरवून केलं का?  एक व्यक्ती तीन केसमध्ये पंच कसा याचं उत्तर द्यावं? समीर वानखेडे आणि फ्लेचर पटेलचा संबंध काय आहे?  लेडी डॉन कोण आहे?  हे फिल्म इंडस्ट्रीमध्ये दहशत निर्माण करत आहेत का? असे सवाल मलिक यांनी केली आहे. 






Nawab Malik On NCB : क्रुझवरील पार्टीतून पकडलेल्या भाजप नेत्याच्या मेहुण्याला सोडलं, समीर वानखेडेंचे कॉल रेकॉर्ड तपासावे : नवाब मलिक


नवाब मलिकांनी म्हटलं आहे की, फ्लेचर पटेल आणि लेडी डॉन याचा खुलासा त्यांनी करावा . फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्या काय करतात याचा खुलासा करावा. पंचनाम्याची एक पद्धत आहे जी एनसीबीकडून तोडण्यात येत आहेत. एनसीबीकडून फर्जीवाडा सुरु आहे. आपल्याच लोकांना पंच बनवलं जातं आणि कारवाई केली जाते.  लेडी डॉन राजकीय पक्षाच्या चित्रपट संघटनेच्या नेत्या आहेत. फिल्म इंटस्ट्रीमध्ये दहशत निर्माण करायची आहे का? असं ते म्हणाले. 


घऱातली माणसं पंच करुन लोकांची फसवणूक


ते म्हणाले की, एनसीबीने माझ्यावर टीका केली होती. पण तुम्ही ठरवून केसेस खोट्या ठरवत आहात. घऱातली माणसं पंच करुन लोकांची फसवणूक केली जात आहे. फिल्म इंडस्ट्रील फ्लेचर पटेल आणि लेडी डॉनच्या माध्यमातून काय उद्योग सुरु आहेत याचा खुलासा एनसीबीने करावा, असंही मलिक यांनी म्हटलं आहे. नवाब मलिक म्हणाले की, कोणतीही केस उभी करायची असते तेव्हा ज्या ठिकाणी घटना घडते तेव्हा तेथील प्रतिष्ठीत नागरिक, आजुबाजूची लोक यांना बोलवून पंचनामा करणं कायदेशीर तरतूद आहे. गेल्या एक वर्षातील माहिती घेतला असता एनसीबीने तीन केसेसमध्ये स्वतंत्र पंच म्हणून फ्लेचर पटेल यांचं नाव आहे. याचा अर्थ स्वतंत्र पंच यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. ही कारवाई ठरवून केली असल्याचं हे यातून स्पष्ट होत आहे. कोर्टाने अनेकदा स्वतंत्र पंच अनेक केसमध्ये असल्यास यात तथ्य नाही असा निष्कर्ष काढला आहे. याचा अर्थ एनसीबीच्या माध्यमातून फर्जीवाडा सुरु आहे, असा पुनरुच्चार नवाब मलिकांनी केला.


भाजपकडून राज्याला बदनाम करण्याचं कट कारस्थान


नवाब मलिकांनी पत्रकार परिषदेआधी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या केंद्रीय यंत्रणेबाबत भाष्य केले आहे. कारण राज्यातील गुप्तचर यंत्रणा त्यांना याबाबत माहिती देत असते. राज्याला बदनाम करण्याचं कट कारस्थान भाजपकडून सुरू आहे. फडणवीस यांचं नेहमीच खोटं बोला रेटून बोला हे काम सुरू असतं. नेमकं भ्रष्टाचारी कोण आहे हे हळूहळू समोर येईलच. त्यांना वाटतं असेल की सौ चुहे खा के बिल्ली हज को चली, परंतु आता त्यांनी लक्षात घ्यावं सत्य लवकरच समोर येईल, असं देखील नवाब मलिक म्हणाले.