Aryan Khan Chat Leak : सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. गेल्या सुनावणीत कोर्टानं आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यामुळे गेल्या 17 दिवसांपासून अटकेत असणारा आर्यन खान आज घरी जाणार की, त्याची रवानगी पुन्हा तुरुंगात होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


आजच्या सुनावणीपूर्वी या प्रकरणात आणखी एक खुलासा झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एनसीबीच्या हाती आर्यन खानचे काही चॅट्स लागले आहेत. क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी आर्यन खानसोबत बॉलिवूडची एक नवखी अभिनेत्रीचे चॅट एनसीबीच्या हाती लागले आहेत. चॅट्समध्ये अभिनेत्रीसोबत आर्यन खानची अमंली पदार्थांबाबत चर्चा झाली होती. कोर्टात सुनावणी दरम्यान एनसीबीनं ज्या आरोपींचे चॅट्स सादर केले होते. त्यामध्ये आर्यन खानसह या अभिनेत्रीच्याही चॅट्सचा समावेश आहे.  


याव्यतिरिक्त आर्यन खानचे काही ड्रग्स पेडलर्ससोबतचे चॅट्सही एनसीबीनं कोर्टासमोर सादर केले होते. अशातच आता या चॅट्समुळे आर्यन खानच्या जामीन अर्ज फेटाळला जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ,


आर्यन खान काही वर्षांपासून ड्रग्स घेतो : अनिल सिंह 


एनसीबीनं त्यांना तीन ऑक्टोबर रोजी अटक केली होती. नार्कोटिक्स ड्रग्स अॅन्ड सायकॉट्रॉपिक सब्सटेंस अॅक्ट (एनडीपीएस) प्रकरणी विशेष न्यायाधीश व्हीव्ही पाटील यांच्या न्यायालयात आर्यन खान आणि दोन इतर आरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांनी जामीनासाठी याचिका दाखल केली होती. एनसीबीला आपली बाजू मांडण्यासाठी अतिरिक्त सॉलिसीटर जनरल (एएसजी) अनिल सिंह यांनी दावा केला की, असे पुरावे आहेत की, जे दाखवताच आर्यन खान काही वर्षांपासून अमंली पदार्थांचं सेवन करत होता, हे स्पष्ट होईल.  


कधी झाली अटक?


आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी गोवाला जाणाऱ्या क्रूझवर छापेमारीदरम्यान अटक केली होती, तर उर्वरित पाच इतर आरोपींना दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली होती. रिमांड कालावधी संपल्यानंतर आरोपींना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर एम नेर्लीकर यांच्यासमोर हजर करण्यात आले. येथून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.


'आर्यन खान कैदी नंबर-956' 


मुंबई ड्रग्स प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानची चर्चा सगळीकडे चर्चा सुरू आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खान आणि गौरी खान सध्या आर्यनमुळे चिंतेत आहेत. आर्यनला आर्थर रोड येथील तुरूंगात ठेवण्यात आले आहे. त्याचा कैदी नंबर   N956 आहे. आर्यनला 20 ऑक्टोबरपर्यंत तुरूंगात राहावे लागणार आहे. त्यानंतर त्याच्या जामीनावर  निर्णय होणार आहे. काल त्याच्या जामीनाची सुनावणी पूर्व झाली. न्यायाधीशांनी 20 ऑक्टोबर पर्यंत निकाल राखून ठेवला आहे.  आर्यन आणि अरबाज मर्जेंटसह इतर आरोपींना मुंबईतील आर्थर रोड कारागृहातील बरॅक नंबर एक मध्ये ठेवण्यात आले आहे.  बरॅक नंबर एकचा वापर कोरोना काळात आयसोलेशन वॉर्ड म्हणून करण्यात येत होता. जेव्हा नवा कैदी येतो तेव्हा त्याला एक आठवडा आयसोलेशन वॉर्डमध्ये म्हणजेच  बरॅक नंबर-1 मध्ये ठेवण्यात येते. एक आठवडा आयसोलेशन पूर्ण केल्यानंतर  ड्रग्स प्रकरणातील आर्यन खान आणि त्याच्यासह अटकेत असलेल्या इतरांना कोरोना चाचणी करण्यात आली. 14 तारखेला आर्यन आणि इतर सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर आर्यनला इतर कैद्यांसोबत शिफ्ट करण्यात येणार होते. पण सुरक्षेच्या कारणामुळे ड्रग्स प्रकरणातील आरोपींसोबत आर्थर रोड येथील तुरूंगाच्या बरॅकमध्येच ठेवण्यात आले.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Cruise Drugs Case : जेल की बेल? आज फैसला; क्रूझ ड्रग्ज प्रकरणी 17 दिवसांपासून आर्यन खान अटकेत, सुटका होणार?