एक्स्प्लोर

बेपत्ता API बिद्रे प्रकरण : अभय कुरुंदकरच्या खासगी ड्रायव्हरला अटक

पोलीस निरिक्षक आश्विनी बिद्रे प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी अभय कुरुंदकर याचा ड्रायव्हर कुंदन भंडारी याला पोलिसांनी कांदिवलीमधून अटक केली आहे.

मुंबई : पोलीस निरिक्षक आश्विनी बिद्रे प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी अभय कुरुंदकर याचा ड्रायव्हर कुंदन भंडारी याला पोलिसांनी कांदिवलीमधून अटक केली आहे. अश्विनी बिद्रेंना गायब करणाऱ्या अभय कुरुंदकरला मदत केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. कुंदनच्या अटकेमुळे या केसच्या तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे. अभय कुरुंदकर याच्या कॉल डिटेल्सवरुन कुंदनला अटक करण्यात आली. कुंदन हा अभय कुरुंदकरचा खासगी ड्रायव्हर होता. त्यामुळे आता या प्रकरणी नेमकी माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बेपत्ता API बिद्रे प्रकरण : अभय कुरुंदकरच्या खासगी ड्रायव्हरला अटक नेमकं प्रकरण काय? 15 एप्रिल 2016 पासून अश्विनी राजू गोरे या महिला पोलीस अधिकारी मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झाल्या आहेत. त्या बेपत्ता झाल्या नसून त्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांनी तिला बेपत्ता केल्याचा आरोप करत, त्यांच्यावर कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या तपासात पोलिसच त्यांना सहकार्य करत नसल्याचा आरोप अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आळते गावातील एक महत्त्वकांक्षी तरुणी अश्विनी जयकुमार बिद्रे या 2000 वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या. याचदरम्यान त्यांचा विवाह 2005 साली हातकणंगले गावातील तरुण राजू गोरे यांच्यासोबत झाला. लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात अश्विनी स्पर्धा परीक्षा पास झाल्या आणि त्यांना पोलीस उपनिरिक्षक पद मिळालं. एपीआय अश्विनी गोरे दीड वर्षांपासून बेपत्ता, वरिष्ठ अधिकाऱ्यावर संशय पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगली इथे झाली. यावेळी त्यांची ओळख त्याच पोलीस ठाण्यात असणाऱ्या वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली. या दोघांमध्ये जवळीक वाढली होती. त्यानंतर 2013 साली अश्विनी गोरे यांना प्रमोशन मिळाल्याने त्या रत्नागिरीला रुजू झाल्या. इथेही अभय कुरुंदकर हे अश्विनीला भेटण्यासाठी वांरवार येत होते. हे सर्व प्रकरण अश्विनी यांचे पती आणि वडिलांना समजलं. बेपत्ता API बिद्रे प्रकरण : अभय कुरुंदकरच्या खासगी ड्रायव्हरला अटक अश्विनी आणि अभय यांच्यात वाद यावेळी अभय कुरुंदकर आणि अश्विनीमध्ये सतत वाद होत होते. तेव्हा कुरुंदकरांनी अश्विनी यांच्या पतीला गायब करण्याच्या धमक्याही दिल्या होत्या. यामुळे अश्विनी यांचं कुटुंब व्यथित झालं होतं. या काळातच 2015 साली अश्विनी यांची बदली कळंबोली पोलीस ठाण्यात झाली. मात्र, त्या हजर झाल्या नाहीत. त्या हजर का झाल्या नाहीत या आशयाचं पत्र पोलीस खात्यानेही पाठवलं. त्यावेळी अश्विनीच्या घरातील लोकांना त्या गायब झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी कळंबोली पोलिसात याची तक्रार दाखल केली. अश्विनी आणि अभय कुरुंदकर यांच्यातील वादाचे, प्रेमाचे सर्व संवाद अश्विनीने आपल्या संगणकात रेकॉर्ड करुन ठेवले होते. अश्विनीच्या घरातील मंडळींनी जेव्हा संगणक पाहिला त्यावेळी या गोष्टी उघड झाल्या. अभय कुरुंदरकांनी भांडणादरम्यान वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचं उघड झालं. हे सर्व पुरावे कळंबोली पोलिसांना देताच अभय करुंदकर हे तात्काळ रजेवर गेले होते. मात्र, हे संपूर्ण प्रकरण मीडियात आल्यानंतर पोलिसांनी अभय कुरुंदकरला अटक केली होती. संबंधित बातम्या: बेपत्ता API बिद्रे प्रकरण: वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर निलंबित बेपत्ता API बिद्रे प्रकरण: कळंबोली, जळगाव आणि सांगलीतून धरपकड घराला नवा रंग, कुरुंदकरांनी बिद्रेंचा घातपात केल्याचा संशय अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण : पोलीस अधिकारी कुरुंदकर अटकेत बेपत्ता पोलिस अश्विनी बिद्रेंना अभय कुरुंदकरांची मारहाण

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत घडामोडींना वेग, युट्यूबर ध्रुव राठी पोलिसांच्या ताब्यात, CJPची ट्वीट करुन माहिती
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत घडामोडींना वेग, युट्यूबर ध्रुव राठी पोलिसांच्या ताब्यात, CJPची ट्वीट करुन माहिती
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Pune MPSC Protest: पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
CJP Protest: दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
Delhi CJP Protest: सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
Jalgaon Crime: ‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
Nagpur Crime: नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
Totaladoh Dam Water Level : नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
Embed widget