Anil Deshmukh | अनिल देशमुखांच्या याचिकेवर गुरूवारी हायकोर्टात सुनावणी, ईडीच्या कारवाईविरोधात याचिका
ईडीच्या (ED) कारवाईविरोधात माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची हायकोर्टात याचिका. समन्स रद्द करण्याची याचिकेत प्रमुख मागणी.

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बजावलेल्या समन्सविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर गेल्या आठवड्यात सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिल्यामुळे त्यांना तुर्तास कोणताही दिलासा मिळालेला नाही. गेल्या गुरूवारी ही याचिका न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्यापुढे सुनावणीसाठी आली होती. मात्र, न्यायमूर्ती काही कारणास्तव यावर सुनावणी घेण्यास नकार दिल्यानं ही याचिका आता उद्या न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्यासमोर सुनावणीसाठी येणार आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांनी राज्याच्या गृहमंत्रिपदावर असताना दरमहा 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले असल्याचा गंभीर आरोप केला होता. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला तसेच सीबीआय आणि ईडी मार्फत या प्रकरणाचा तपास आणि चौकशी सुरू आहे. त्यातच ईडीकडून आतापर्यंत अनिल देशमुख यांना पाचवेळा चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत. मात्र, देशमुख ईडीपुढे वेळोवेळी हजर झालेले नाहीत. या सर्व प्रकरणाविरोधात त्यांनी आता न्यायालयात धाव घेतली असून ईडीने बजावलेले समन्स रद्द करण्यात यावे, अशी मुख्य मागणी याचिकेतून केली आहे.
परमबीर सिंहांविरोधात वॉरंट जारी, चांदिवाल आयोगाकडनं 50 हजारांचा जामीनपात्र वॉरंट काढण्याचे निर्देश
तपासयंत्रणेपुढे कागदपत्रे आणि जबाब हा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोंदविण्याची परवानगीही याचिकेतून मागण्यात आली आहे. तसेच अधिकृत मध्यस्थामार्फत ईडीसमोर चौकशीला हजर राहण्याची परवानगी उच्च न्यायालयाने आपल्याला द्यावी, अशी मागणीही देशमुख यांनी अॅड. अनिकेत निकम यांच्यामार्फत आपल्या याचिकेतून केली आहे. दुसरीकडे, देशमुख राज्याचे गृहमंत्री असताना डिसेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत मुंबईतील ऑकेस्ट्रा बार मालकाकडून त्यांनी अंदाजे 4.7 कोटी रुपये सचिन वाझेच्या माध्यमातून मिळवल्याचा आरोप ईडीनं केला आहे.
अनिल देशमुखांविरोधात ईडीची लूकआऊट नोटीस जारी
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात ईडीनं लूकआऊट नोटीस जारी केल्याचा दावा याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी केला आहे. अनिल देशमुखांना लवकरच अटक होऊ शकते, असा दावाही जयश्री पाटील करत आहेत. मात्र ईडीच्या अधिकाऱ्यांकडून अद्याप यांदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
Before You Go
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप






















