Amruta Fadnavis on Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय युद्ध आता कोर्टाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे. आज, सकाळी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांची कन्या निलोफर खान यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना अब्रूनुकसानीसंदर्भात नोटीस धाडली. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नवाब मलिकांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेपार्ह वक्तव्य मागे घ्यावं अशी मागणी निलोफर खान यांनी केली आहे. तर नवाब मलिकांनी ४८ तासांत आक्षेपार्ह ट्विट मागे घेऊन माफी मागावी अशी मागणी अमृता फडणवीस यांनी केली आहे.
नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आरोप करताना, ड्रग्ज पेडलर जयदीप राणा याच्याकडून अमृता फडणवीस यांच्या अल्बमला अर्थ साहाय्य करण्यात आले होते, असा आरोप केला होता. त्यानंतर अमृता फडणवीस यांच्याकडून हे आरोप फेटाळण्यात आले होते. नवाब मलिक यांनी राणा आणि फडणवीस यांचे संबंध असल्याचा आरोप करण्याआधी ट्वीटरवर भाजप आणि ड्रग्ज पेडलर यांच्या संबंधावर चर्चा करूयात असे म्हटले होते. नवाब मलिक यांनी या ट्वीट प्रकरणी 48 तासांत माफी मागावी अशी मागणी अमृता फडणवीस केली आहे. मलिक यांनी माफी न मागितल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे म्हटले होते.
देवेंद्र फडणवीसांना अब्रूनुकसानीसंदर्भात नोटिस
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नवाब मलिक यांची कन्या निलोफर खान यांनी अब्रूनुकसानीसंदर्भात नोटीस पाठवली आहे. नवाब मलिक यांचे जावई आणि निलोफर यांचे पती समीर खान यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केले होते. हे आरोप निराधार असल्याचे मलिक आणि निलोफर खान यांनी म्हटले.
ड्रग्ज प्रकरणी मलिक आक्रमक!
गुजरातमध्ये दुसऱ्यांदा ड्रग्जचा साठा पकडल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. ड्रग्जचा खेळ गुजरातमधून चालवला जातो का? असा सवाल नवाब मलिकांनी केला आहे. मलिक यांनी म्हटलं की, मुंबई शहर ड्रग्जचं हब झालं आहे असा दावा वारंवार केला जातो. आता एक घटनाक्रम समोर आला आहे की गुजरातच्या द्वारका येथे 350 कोटी रुपये किमतीचं ड्रग्ज सापडले आहेत. समुद्रामार्गे गुजरातमध्ये येत सर्व देशभरात ड्रग्ज जातंय का? याची चौकशी करावी, अशीही मागणी मलिक यांनी केली. मनीष भानुशाली, धवल भानुशाली सुनील पाटील हे गुजरातच्या नोव्हेंटॅल हॉटेल मध्ये राहत होते. त्यांचे किरीटसिंह राणा यांच्याशी संबंध आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा ड्रग्ज सापडल्यामुळे पुन्हा आता यांच्याबाबत संशय निर्माण झाला आहे, असं मलिक म्हणाले.
संबंधित बातम्या:
Nawab Malik: ड्रग्जचा खेळ गुजरातमधून चालवला जातो का? नवाब मलिकांचा सवाल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha