Nawab Malik Live : गुजरातमध्ये दुसऱ्यांदा ड्रग्जचा साठा पकडल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. ड्रग्जचा खेळ गुजरातमधून चालवला जातो का? असा सवाल नवाब मलिकांनी केला आहे. मलिक यांनी म्हटलं की, मुंबई शहर ड्रग्जचं हब झालं आहे असा दावा वारंवार केला जातो. आता एक घटनाक्रम समोर आला आहे की गुजरातच्या द्वारका येथे 350 कोटी रुपये किमतीचं ड्रग्ज सापडले आहेत. समुद्रामार्गे गुजरातमध्ये येत सर्व देशभरात ड्रग्ज जातंय का? याची चौकशी करावी, अशीही मागणी मलिक यांनी केली.  मनीष भानुशाली, धवल भानुशाली सुनील पाटील हे गुजरातच्या नोव्हेंटॅल हॉटेल मध्ये राहत होते. त्यांचे किरीटसिंह राणा यांच्याशी संबंध आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा ड्रग्ज सापडल्यामुळे पुन्हा आता यांच्याबाबत संशय निर्माण झाला आहे, असं मलिक म्हणाले.  


महाराष्ट्रात पाव ग्रॅम ड्रग्ज शोधणाऱ्यांनी गुजरातमधील 350 किलो ड्रग्जचा अभ्यास करावा : संजय राऊत


मलिक म्हणाले की, आम्ही देशातील सर्व डीसीपींना विनंती करतो की देशांत कायदा यासाठी बनवण्यात आला होता. त्यामुळे ड्रग्जचे व्यवसाय बंद होतील. त्यामुळे आता गुजरातसारख्या राज्यातून अशाप्रकारे बाबी समोर येत आहेत. त्यामुळे डीसीपी, डीजी याबाबत योग्य कारवाई करतील अशी अपेक्षा आहे, असं मलिक म्हणाले.


मी एकटा नाही, माझ्यासोबत मुख्यमंत्र्यांसह सर्व पक्षांचा पाठिंबा
त्यांनी म्हटलं की, लोकांना वाटत आहे की नवाब मलिक एकटे पडले आहेत. परंतु त्यांना सांगतो मला शरद पवार, मुख्यमंत्री, सर्व पार्टी यांचा पाठिंबा आहे. पूर्णपणे मंत्रिमंडळ सोबत आहे. मुख्यमंत्री यांनी काल माझं कौतुक केलं, असंही ते म्हणाले.


खोट्या नोटांच्या रॅकेटला तत्कालीन फडणवीस सरकारचा पाठिंबा, केसेस कमकुवत करण्यात वानखेडेंची मदत : नवाब मलिक


देवेंद्र फडणवीसांना अब्रूनुकसानीसंदर्भात नोटिस
मलिक म्हणाले की,  महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या जावयाबाबत काही आरोप लावले होते. यामध्ये ते बोलले होते की समीर खान यांच्या घरात ड्रग्ज सापडले होते. परंतु हे खोटं आहे त्यामुळे आम्ही मानहानीचा दावा दाखल करणार आहोत असं मी बोललो होतो.  त्यानुसार आज आम्ही नोटीस पाठवली आहे.  






ते म्हणाले की,  माझे पुतळे जाळत आहेत त्यांना सांगणं आहे पुतळे जाळत असाल तर जाळा परंतु मी त्यांना आरसा दाखवत राहणार.  देवेंद्र फडणवीस यांनी बर्नार्ड शॉच्या एका वाक्याचा वापर करून माझ्यावर टीका केली आहे. परंतु आम्ही अशी टीका कोणावरही करत नाही. लोकांना जनावरांची उपाधी देणे ही भाजपची संस्कृती आहे, असं ते म्हणाले.