मुंबई : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांची (Nawab Malik) कन्या निलोफर खान (Nilofer Malik Khan) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) अब्रूनुकसानीसंदर्भात नोटीस धाडली आहे. फडणवीसांनी माझ्या कुटुंबावर खोटे आरोप लावले असा आरोप निलोफर खान यांनी लावला आहे. आता आम्ही या लढाईत मागे हटणार नाही अशी भावना निलोफर यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. निलोफर खान यांनी देवेंद्र फडणवीस यांना थेट 5 कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. तर कायदेशीर नोटीसला कायदेशीर उत्तर दिले जाईल, अशा शब्दात भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत उत्तर दिलं आहे.
निलोफर मलिक खान या नवाब मलिक यांच्या कन्या आहेत. त्यांचे पती समीर खान यांच्यावर ड्रग्ज प्रकरणात आरोप करण्यात आले आहेत. निलोफर खान या सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतात. तसेच विरोधकांच्या टीकेला थेट उत्तरं देत असतात. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी म्हटलं की, ते माजी मुख्यमंत्री आहेत. जेव्हा कोणतीही गोष्ट ते बोलतील, तर तिची खातरजमा त्यांनी करणं आवश्यक आहेत. ते सातत्याने म्हणालेत की समीर खान यांच्याकडे ड्रग्ज सापडलं. पंचनाम्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आमच्याकडे काहीही सापडलेलं नाही. त्यामुळे सातत्याने तुम्ही एकच आरोप करत आहात हे योग्य नाही. आम्ही त्यांना नोटीस पाठवली आहे. पाहुयात यावर त्यांचं काय म्हणणं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस
फडणवीसांनी देखील मलिकांचे संबंध अंडरवर्ल्डशी असल्याची टीका केली होती. तसेच फडणवीसांनी निलोफर यांचे पती समीर खान यांच्या घरात ड्रग्ज सापडल्याचा दावा केला होता मात्र फडणवीसांनी केलेले आरोप पुर्णपणे चुकीचे असल्याचे निलोफर यांनी सांगितले होते. त्यावरून आता निलोफर यांनी फडणवीसांवर अब्रू नुकसानीचा दावा केला आहे आणि तशी नोटीस देखील त्यांनी फडणवीसांना पाठवली आहे.
Nawab Malik: ड्रग्जचा खेळ गुजरातमधून चालवला जातो का? नवाब मलिकांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांनी 'डुकराशी कुस्ती खेळू नये, हे मी आधीच शिकलो आहे. तुमच्या अंगाला घाण लागते, पण डुकराला ते आवडते' असे ट्वीट केले होतो. त्यावर निलोफर मलिक यांनी प्रत्युत्तर देत म्हटलं आहे की, "आयुष्यात एक बळीचा बकरा शोधू नका. आपण केलेल्या चुकांची फळ भोगायला तयार राहा" असे उत्तर दिले होते.
देवेंद्र फडणवीसांना अब्रूनुकसानीसंदर्भात नोटीस, काय म्हणाले मलिक
मलिक म्हणाले की, महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या जावयाबाबत काही आरोप लावले होते. यामध्ये ते बोलले होते की समीर खान यांच्या घरात ड्रग्ज सापडले होते. परंतु हे खोटं आहे त्यामुळे आम्ही मानहानीचा दावा दाखल करणार आहोत असं मी बोललो होतो. त्यानुसार आज आम्ही नोटीस पाठवली आहे.