एक्स्प्लोर

Navneet Rana: खासदार नवनीत राणांना सत्र न्यायालयाचा धक्का, जातप्रमाणपत्रासंबंधी दोषमुक्तीसाठीचा अर्ज फेटाळला, वॉरंटही कायम

Caste Certificate: खासदार नवनीत राणा यांना कोणताही दिलासा देण्यात मुंबई सत्र न्यायालयाने नकार दिला असून शिवडी न्यायालयाचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. 

मुंबई: जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी खासदार नवनीत राणांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांनी दाखल केलेला दोष मुक्ततेसाठी अर्ज (Navneet Rana Caste Certificate) न्यायालयाने आज फेटाळला. शिवडी न्यायालयाचा निर्णय मुंबई सत्र न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आला आहे. तसेच शिवडी न्यायालयाने जारी केललं अजामीनपात्र वॉरंटही योग्य असल्याचं सांगत सत्र न्यायालयाने त्या वॉरंटला स्थगिती देण्यास नकार दिला. 

खासदार नवनीत राणा यांनी शिवडी न्यायालयाच्या आदेशाला मुंबई सत्र न्यायालयात आव्हान दिलं होतं. शिवडी न्यायालयानंही नवनीत राणा यांचा दोषमुक्तीसाठीचा अर्ज यापूर्वी फेटाळला होता. खासदार नवनीत राणा यांच्यावर जात प्रमाणपत्राप्रकरणी 2014 साली मुलूंड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.  

Amravati MP Navneet Rana Caste Certificate : नवनीत राणा यांच्यावर आरोप काय?  

जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप नवनीत राणा यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा यांच्या वडिलांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Navneet Rana Caste Certificate : जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती 

अमरावतीच्या (Amaravti) खासदार नवनीत राणा यांचं जातप्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने 8 जून 2021 रोजी रद्द केलं. शिवाय त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला. उच्च न्यायालयाच्या या निकालामुळे नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली होती. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी नवनीत राणा यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिका 2017 मध्ये उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. 

खासदार नवनीत राणा यांनी निवडणूक अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात अनुसूचित जमातीबाबत दिलेले प्रमाणपत्र बोगस आहे. त्यांनी जात प्रमाणपत्र समितीसमोर देखील त्यांच्या जातीचा खोटा दावा केला आहे, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. त्यानंतर हायकोर्टाने निर्णय देत जातप्रमाणपत्र रद्द केलं. त्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 22 जून 2021 रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने नवनीत कौर राणा यांना दिलासा देत जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BJP on Pranjal Khewalkar Case : प्रांजल खेवलकर एकनाथ खडसेंचाच वारसा चालवताय, भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप, म्हणाले, अनेक वर्षांपासून...
प्रांजल खेवलकर एकनाथ खडसेंचाच वारसा चालवताय, भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप, म्हणाले, अनेक वर्षांपासून...
पाचव्या महिन्यातच बायको म्हणाली, मी गर्भवती, पण बायकोच्या एक्स बाॅयफ्रेडनं नवऱ्याला फोनाफोनी करुन कहाणी सांगताच पायाखालची जमीन सरकली; सासू सासऱ्याला माहीत असूनही...
पाचव्या महिन्यातच बायको म्हणाली, मी गर्भवती, पण बायकोच्या एक्स बाॅयफ्रेडनं नवऱ्याला फोनाफोनी करुन कहाणी सांगताच पायाखालची जमीन सरकली; सासू सासऱ्याला माहीत असूनही...
Mumbai kabutar khana: कबुतरांची पिसं आणि घाणीला कंटाळलात, मग हे पाच उपाय करा, कबुतरं आसपासही फिरकणार नाहीत
कबुतरांची पिसं आणि घाणीला कंटाळलात, मग हे पाच उपाय करा, कबुतरं आसपासही फिरकणार नाहीत
Bihar SIR : राहुल गांधींच्या वादळी प्रेस कॉन्फरन्सनंतर बिहार निवडणुकीबाबत मोठी अपडेट, निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण माहिती
राहुल गांधींच्या वादळी प्रेस कॉन्फरन्सनंतर बिहार निवडणुकीबाबत मोठी अपडेट, निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC : पवारसाहेब भाजपसह येणं मला तरी शक्य वाटत नाही - छगन भुजबळ
Koyta Gang | पुण्यात Koyta Gang ची दहशत, नागरिकांमध्ये संताप व्यक्त
Raksha Khadse : महाजन आणि खडसेंमधील वादासंदर्भात रक्षा खडसेंनी बोलणं टाळलं
Mahadevi Elephant | महादेवी Nandani Math मध्ये परतणार, Ambani परिवाराचे आभार, SC मध्ये याचिका
Maharashtra Rain | वाशिममध्ये जीवघेणा प्रवास, पूल पाण्याखाली, रस्ता बंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP on Pranjal Khewalkar Case : प्रांजल खेवलकर एकनाथ खडसेंचाच वारसा चालवताय, भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप, म्हणाले, अनेक वर्षांपासून...
प्रांजल खेवलकर एकनाथ खडसेंचाच वारसा चालवताय, भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप, म्हणाले, अनेक वर्षांपासून...
पाचव्या महिन्यातच बायको म्हणाली, मी गर्भवती, पण बायकोच्या एक्स बाॅयफ्रेडनं नवऱ्याला फोनाफोनी करुन कहाणी सांगताच पायाखालची जमीन सरकली; सासू सासऱ्याला माहीत असूनही...
पाचव्या महिन्यातच बायको म्हणाली, मी गर्भवती, पण बायकोच्या एक्स बाॅयफ्रेडनं नवऱ्याला फोनाफोनी करुन कहाणी सांगताच पायाखालची जमीन सरकली; सासू सासऱ्याला माहीत असूनही...
Mumbai kabutar khana: कबुतरांची पिसं आणि घाणीला कंटाळलात, मग हे पाच उपाय करा, कबुतरं आसपासही फिरकणार नाहीत
कबुतरांची पिसं आणि घाणीला कंटाळलात, मग हे पाच उपाय करा, कबुतरं आसपासही फिरकणार नाहीत
Bihar SIR : राहुल गांधींच्या वादळी प्रेस कॉन्फरन्सनंतर बिहार निवडणुकीबाबत मोठी अपडेट, निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण माहिती
राहुल गांधींच्या वादळी प्रेस कॉन्फरन्सनंतर बिहार निवडणुकीबाबत मोठी अपडेट, निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण माहिती
'शाळेत माझा द्वेष करणाऱ्या माणसाशी मी लग्न केलंय' शाळेत जेवणाचा डबा फोडण्यापासून ते अनपेक्षित जीवनसाथीवर भेटल्यावर लग्नापर्यंत गेलेली हटके लव्हस्टोरी व्हायरल!
'शाळेत माझा द्वेष करणाऱ्या माणसाशी मी लग्न केलंय' शाळेत जेवणाचा डबा फोडण्यापासून ते अनपेक्षित जीवनसाथीवर भेटल्यावर लग्नापर्यंत गेलेली हटके लव्हस्टोरी व्हायरल!
Rohit Sharma Lamborghini Urus Video: रोहित शर्मानं कोट्यवधी रुपयांची दुसरी आलिशान Lamborghini Urus घेतली; फीचर्स पाहून विश्वास बसणार नाही!
Video: रोहित शर्मानं कोट्यवधी रुपयांची दुसरी आलिशान Lamborghini Urus घेतली; फीचर्स पाहून विश्वास बसणार नाही!
'जे माझे मतदार आहेत त्या साडे तीन लाख मतदारांची नावे यादीतून कापली' नितीन गडकरींच्या वक्तव्याचा 'तो' व्हिडिओ यशोमती ठाकुरांकडून ट्विट
'जे माझे मतदार आहेत त्या साडे तीन लाख मतदारांची नावे यादीतून कापली' नितीन गडकरींच्या वक्तव्याचा 'तो' व्हिडिओ यशोमती ठाकुरांकडून ट्विट
CBSE Open Book Exam : नववीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आता पुस्तकं समोर ठेवून परीक्षा देता येणार, CBSE चा महत्त्वाचा निर्णय, काय आहे 'ओपन बुक' पद्धत?
नववीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आता पुस्तकं समोर ठेवून परीक्षा देता येणार, CBSE चा महत्त्वाचा निर्णय, काय आहे 'ओपन बुक' पद्धत?
Embed widget