Maharashtra Mumbai News: लालबागच्या राजाच्या मंडपात फ्री स्टाईल हाणामारी; कार्यकर्ते आणि भाविक आपापसांत भिडले
Lalbaugcha Raja 2023 : लालबागच्या राजाच्या मंडळाच्या मंडपात दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचं दुर्भाग्यपूर्ण चित्र पाहायला मिळालं.
![Maharashtra Mumbai News: लालबागच्या राजाच्या मंडपात फ्री स्टाईल हाणामारी; कार्यकर्ते आणि भाविक आपापसांत भिडले Ganeshotsav 2023 Lalbaugcha Raja Ganpati Mandal freestyle fighting between devotees and mandal workers Maharashtra Mumbai News: लालबागच्या राजाच्या मंडपात फ्री स्टाईल हाणामारी; कार्यकर्ते आणि भाविक आपापसांत भिडले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/22/94a5199f1748b4a342f422bce505755d169535964569988_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Mumbai News: देशासह राज्यभरात गणेशोत्सवाची (Ganeshostav 2023) धामधूम सुरू आहे. अशातच मुंबईतील नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविकांनी गर्दी केली आहे. याच लालबागच्या राजाच्या मंडपात (Lalbaugcha Raja Ganpati Mandal) तुफान गर्दी झाली आहे. अशातच गर्दी अनियंत्रित झाल्यानं मंडळाचे पदाधिकारी आणि भाविकांमध्ये प्रचंड हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या भाविकांना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. भाविक आणि कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
लालबागच्या राजाच्या मंडळाच्या मंडपात दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचं दुर्भाग्यपूर्ण चित्र पाहायला मिळालं. मंडळाचे कार्यकर्ते आणि भाविक आपापसांत भिडल्याचं पाहायला मिळालं. अशातच दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भक्तांना पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप सध्या केला जात आहे.
नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती आणि संपूर्ण देशाचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी देशासह राज्यभरातून भाविक येत असतात. मंडळाच्या मंडपात अभूतपूर्व गर्दी होतेय. गणरायाच्या मंडपात सुरक्षेसाठी पोलीस आणि कार्यकर्ते तैनात असतात. पण गर्दीचा रेटा प्रचंड असल्यामुळे गर्दी नियंत्रित करणं केवळ अशक्य असतं.
काही वेळापूर्वीच हा प्रकार घडला असल्याची माहिती मिळत आहे. लालबागच्या राजाच्या मंडळात असे प्रकार दरवर्षी घडत असल्याचं आपल्याला नेहमीच ऐकायला मिळत असतं. कधी पदाधिकारी आणि पोलिसांमधील हाणामारी, तर कधी पोलिसांकडून पत्रकारांवर करण्यात आलेली अरेवारी, तर कधी भाविकांना झालेली धक्काबुक्की... यांसारखे प्रकार अनेकदा घडतात आणि त्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
पाहा व्हिडीओ : Lalbaugcha Raja Fight :लालबागच्या राजाच्या मंडपात हाणामारी, कार्यकर्ते आणि भाविकांमध्ये राडा
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)