कोरोना व्हायरसचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय राज्यात लॉकडाऊन असल्याने सर्व आर्थिक व्यवहार बंद आहेत. परिणामी राज्यासमोर कोरोनाला रोखणे आणि आर्थिक परिस्थिती असं दुहेरी संकट उभं राहिलं आहे. मात्र, आताच्या घडीला कोरोनाला रोखणे ही राज्याची प्राथमिकता आहे. यातचं आर्थिक गणित बिघडल्याने सरकारी रुग्णालयांना निधी कमी पडण्याची भीती निर्माण झाली आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सक्षम असलेल्या सहकारी बँका, साखर कारखाने, दूध संघ यांना सरकारी हॉस्पिटल चालवण्याची परवानगी देता येईल का, याबाबत विचार करण्यात यावा. यामुळे ग्रामीण भागातही चांगली आरोग्य सेवा देण्यास मदत होईल. अशी सूचना मांडली आहे.
Coronavirus | देशात 24 तासात कोरोनाचे 678 नविन रूग्ण, 33 जणांचा मृत्यू : आरोग्य मंत्रालय
राज्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती
देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. आताच्या घडीला राज्यात 1574 लोकांना कोरोना झाल्याचं निदान झालं आहे. यात सर्वाधिक मुंबईत आठशेच्यावर कोरोनाबाधितांची संख्या आहे. तर, त्याखालोखाल पुणे जिल्ह्यात दोनशेच्यावर लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, कोरोनाने आता शहराकडून गावाकडे हातपाय पसरायला सुरुवात केलीय.
देशात 24 तासात कोरोनाचे 678 नवीन रूग्ण, 33 जणांचा मृत्यू
जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आतापर्यंत 6412 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. आतापर्यंत 199 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 504 कोरोनाचे रुग्ण बरेही झाले आहेत. गेल्या 24 तासात 678 नवीन कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळले असून 33 जणांचा मृत्यू झाला आहे.
Corona Awareness by Bharud | अग ग... भारुडातून कोरोना विषयी प्रबोधन | ABP Majha