मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  21 दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केला आहे. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर लोकांना घरीच राहण्याचं आव्हान लोकांना करण्यात आलं. त्यासोबत संचारबंदीमुळे लोकांच्या प्रवासाला सुद्धा ब्रेक लागला.अशा परिस्थितीमध्ये जर कोणी मृत पावलं तर त्यांच्याकडे सुद्धा जाता येत नसल्याचे चित्र आहे. अशीच एक घटना मुंबई आणि सोलापुरात घडली. सोलापुरात एका आणि मुंबईतील एका हिंदू समाजातील व्यक्तीचं काल निधन झालं मात्र त्या व्यक्तीचे आप्तस्वकीय लॉकडाऊनमुळे पोहोचू शकले नाहीत. मात्र याचवेळी सामाजिक सौहार्दाचं उदाहरण देत मुस्लिम बांधवांनी त्या हिंदू व्यक्तीचे हिंदू पद्धतीने अंतिम संस्कार केले.


शरद पवारांच्या पाठिंब्याशिवाय वाधवान कुटुंबाला गृह सचिवांकडून परवानगी पत्र मिळणं अशक्य : किरीट सोमय्या
वांद्रे येथील गरीबनगरमध्ये राहणारे प्रेमचंद महावीर यांचे काल निधन झाले. त्यांच्या मुलांनी नातेवाईकांना आणि भावाला कळवले. पण संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे कोणी येऊ शकले नाही. नातेवाईक आणि भाऊ राजस्थान, पालघर या ठिकाणी असल्यामुळे त्यांच इथे येणं कठीण होतं.


ज्यामुळे त्यांच्या अंत्यविधी कसा करणार हा प्रश्न उभा राहिला. अशावेळी महावीर यांच्या शेजारी राहणारे मुस्लिम बांधव पुढे आले. सामाजिक एकोपा जपत मुस्लिम बांधवांनी प्रेमचंद महावीर यांना आपल्या खांद्यावर घेऊन हिंदू समशानभूमीमध्ये 'राम नाम सत्य है' चा जप करत त्यांच्यावर अंत्यविधी करण्यास महावीर कुटुंबीयांना मदत केली.

Coronavirus | देशातील 'या' सहा राज्यांत कोरोनाचे 65 टक्के रूग्ण; दक्षिण आणि पश्चिम भारतात सर्वाधिक प्रभाव
यामुळे प्रेमचंद महावीर यांच्या मुलाने या सर्वांचे आभार मानले आहेत. अशा वेळी शेजाऱ्यांकडून झालेली ही मदत आयुष्यभर विसरणार नसल्याचं त्यांनी सांगितला. तर त्यांच्याच शेजारी राहणारे युसूफ शेख यांनी हा शेजारधर्म आणि माणुसकीचा धर्म आहे जो आम्ही पार पाडला आणि अशाच माणुसकीची गरज सध्या या परिस्थितीमध्ये आहे, असं सांगितलं. कोरोनाच्या या महामारीत अशा सामाजिक एकोप्याच्या घटना माणुसकीचे नवे आयाम दाखवत आहेत.


सोलापुरात अफजल आणि तौफिक यांनी अंत्यसंस्कारवेळी खांदा दिला



 माणुसकी जिवंत असल्याचे दर्शन सोलापुरात देखील दिसून आले. जाती-धर्माची सर्व बंधने मोडून एका व्यक्तीचे अंत्यसंस्कार त्याच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी केले. सोलापुरातल्या कुंभारीतल्या गोदुताई विडी घरकुल परिसरात उत्तरप्रदेश येथील भोलाशंकर यांना सोलापुरातील अफजल आणि तौफिक यांनी अंत्यसंस्कारवेळी खांदा दिला. मूळ आगरा येथील भोलाशंकर हे पोटापाण्यासाठी सोलापुरात स्थायिक झाले होते. बुधवारी भोलाशंकर यांचे अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. भोलाशंकर यांचे कोणतेच नातेवाईक सोलापुरात राहायला नव्हते. परिसरात राहणाऱ्या लोकांना नातेवाईकांशी संपर्क केला मात्र लॉकडाऊनमुळे पोहोचणे जवळपास अशक्य होते.

त्यामुळे परिसरात राहणाऱ्या अफजल पठाण, तौफिक तांबोळी, महिबूब मनियार, वसीम तांबोळी, वसीम देशमुख, मल्लिनाथ पाटील हे सर्व जण पुढे आले. याच लोकांनी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे भोलाशंकर यांचे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. भोलाशंकर यांच्या कुटुंबियांनी देखील व्हिडीओ कॉलद्वारे अंतिम दर्शन घेतले. कोरोनाचे संसर्गाची चर्चा सुरु होण्याआधी भोलाशंकर यांचे परिवार मूळ गावी परतले होते.

भोलाशंकर यांची पत्नी आणि मुलगा राजेश वर्मा हे दोन महिन्याआधी आगरा येथे गेले होते. भोलाशंकर मात्र पोटापाण्यासाठी सोलापुरातच थांबून राहिले. मागील चार दिवसांपासून त्यांना छातीत दुखत होते. बुधवारी छातीत दुखण्याचा त्रास अचानक वाढल्याने त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्याच वेळी त्यांचं निधन झालं. अंत्यसंस्कार करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी पैसेही गोळा केले. मात्र अंत्यसंस्काराच्या विधी कोण पूर्ण करणार हा प्रश्न पडला होता.

शेवटी अफजल पठाण, तौफिक तांबोळी, महिबूब मनियार, वसीम तांबोळी, मल्लिनाथ पाटील यांनी तिरडी बांधण्यास सुरुवात केली. कुंभारी परिसरातील एका पौरोहित्याला बोलावून हिंदू परंपरेनुसार अंतिमसंस्काराची तयारी पूर्ण करण्यात आली. याच लोकांनी भोलाशंकर वर्मा यांना खांदा देऊन त्यांचे अंत्यसंस्कार ही केले. भोलाशंकर वर्मा यांचे अंतिमसंस्कार नातेवाईकांनी व्हिडीओ कॉलद्वारे पाहिले.