एक्स्प्लोर

Thane Unlock | 15 ऑगस्टपासून ठाण्यातील सर्व दुकाने खुली राहणार!

ठाणे शहरातील जी आस्थापने P1 आणि P2 नुसार सुरु होते ते 15 ऑगस्टपासून राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सकाळी 9 ते रात्री 7 पर्यंत सुरु ठेवण्यात येतील.

ठाणे : मुंबई पाठोपाठ आता ठाण्यातील सर्व दुकानं खुली होणार आहेत. 15 ऑगस्टपासून सर्व दुकानं आठवड्यातून सातही दिवस खुली ठेवण्यास ठाणे महापालिकेने परवानगी दिली आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिकारी आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोतर्ब करण्यात आलं.

ठाणे शहरातील जी आस्थापने P1 आणि P2 नुसार सुरु होते ते 15 ऑगस्टपासून राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सकाळी 9 ते रात्री 7 पर्यंत सुरु ठेवण्यात येतील. तसंच मॉल्स, मार्केट, जिम आणि स्वीमिंग पूलबाबत आढावा घेऊन त्यानंतर निर्णय घेण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला केल्या आहेत.

कोविड-19 चं संकट अद्यापही टळलेलं नाही. ठाणे महापालिका चांगलं काम करत असून कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असं एकनाथ शिंदे व्यापारी संघटनांच्या बैठकीत म्हणाले. महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षतेखली पार पडलेल्या या बैठकीला खासदार राजन विचारे, महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा आणि विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुंबईत 5 ऑगस्टपासून सर्व दुकानं सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत उघडणार

ठाणे महापालिका क्षेत्रात जून महिन्यात लॉकडाऊन शिथिली केल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी 2 ते 19 जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू केला होता. त्यानंतर P1 आणि P2 पद्धतीने दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली होती. आधीचे चार महिने लॉकडाऊनमुळे दुकानं बंद होती. सम-विषय नियमामुळे महिन्यातून पंधरा दिवस व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवावी लागत आहेत. त्यामुळे व्यापारी वर्ग आर्थिक संकटात सापडला होता. सध्या सण-उत्सवांचा काळ असल्यामुळे नागरिकांची दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी होण्याची भीती आहे. त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी आठवड्यातील सातही दिवस सर्वच दुकानं सुरं ठेवण्याची मागणी व्यापारी संघटनांनी केली होती. यासाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह आयुक्त आणि शहरातील सर्वच आमदारांची भेट घेतली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी 13 ऑगस्ट रोजी या मागणीला मान्यता दिली.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87 टक्के असून रूग्ण दुप्पटीचा वेगही 90 दिवसांवर पोहोचला आहे. मृत्यूचे प्रमाण हे 3.5 टक्क्यांवरुन 3.2 टक्क्यांवर आले आहे. ठाणे महापालिका सातत्याने करत असलेल्या प्रयत्नांमुळेच हे शक्य झाल्याचं सांगून एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा आणि महापालिका प्रशासनाचं कौतुक केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Mukhyamantri Shaurya Padak : राज्य पोलीस दलासाठी मोठी घोषणा, धाडसी कामगिरी करणाऱ्या पोलिसांना मिळणार 'मुख्यमंत्री शौर्य पदक'
राज्य पोलीस दलासाठी मोठी घोषणा, धाडसी कामगिरी करणाऱ्या पोलिसांना मिळणार 'मुख्यमंत्री शौर्य पदक'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
Maharashtra Goverment Cabinet Decision मोठी बातमी: अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाचा मंत्रिमंडळ बैठकीवर इम्पॅक्ट; शाळा आणि वसतिगृहांबाबत कॅबिनेटचे 7 मोठे निर्णय
मोठी बातमी: अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाचा मंत्रिमंडळ बैठकीवर इम्पॅक्ट; शाळा आणि वसतिगृहांबाबत कॅबिनेटचे 7 मोठे निर्णय

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
Vivekanand Patil and Vishwajeet Kadam: विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
Embed widget