एक्स्प्लोर

Ajit Pawar : मास्कबाबत अजितदादांचं महत्वाचं वक्तव्य, 'मुख्यमंत्र्यांनी मास्क ऐच्छिक केला, तरी पण...'

Ajit Pawar On Mask : अजित पवार मात्र अजूनही मास्कचा नियम काटेकोरपणे पाळताना दिसत आहेत. सोबतच त्यांनी मास्क वापराबद्दलही महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

Ajit Pawar On Mask : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मास्क वापराबाबत किती सतर्क असतात हे सर्वांनाच माहित आहे. आता मुख्यमंत्र्यांनी घोषणा करुन मास्क ऐच्छिक केला आहे. या घोषणेनंतर अनेकांनी मास्क काढून फेकला आहे. असं असलं तरी अजित पवार मात्र अजूनही मास्कचा नियम काटेकोरपणे पाळताना दिसत आहेत. सोबतच त्यांनी मास्क वापराबद्दलही महत्वाचं वक्तव्य केलं आहे. अजित पवार म्हणाले की, गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी मास्क ऐच्छिक केला. तरी पण आपण काळजी घेऊन मास्क घातला पाहिजे, खबरदारी घेतली पाहिजे. पहिली लाट, दुसरी लाट आपण पाहिली आहे. अशा लाट पुन्हा येऊ नये, यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले. 

अजित पवार म्हणाले की, निरोगी महाराष्ट्रचा संकल्प आपण आज करतोय.  कोरोनामध्ये हॉस्पिटल इन्फ्रास्ट्रक्चर किती महत्त्वाचे आहे हे जगाला कळलं.  सगळ्या सहकाऱ्यांनी यामध्ये खूप चांगलं काम केलं. अलीकडच्या काळात सवयी लोकांच्या बदलल्या आहेत. आज सुद्धा मुंबईत काही रुग्ण आढळले आहेत.  आपण काळजी घेऊन मास्क घातलं पाहिजे, खबरदारी घेतली पाहिजे, असं ते म्हणाले. 

सध्या समाजात तेढ वाढवणे, दरी पाडण्याचं काम सुरू
यावेळी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, सध्या समाजात तेढ वाढवणे, दरी पाडण्याचं काम सुरू आहे. वास्तविक महागाई तसच इतर समाजिक प्रश्न याकडे लक्ष दिले पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.
 
नेते किंवा पक्ष बदनाम होईल असं काही कृत्य करु नका

नेते किंवा पक्ष बदनाम होईल असं काही कृत्य करु नका. नवीन आलेले आणि जुने असलेले कार्यकर्ते एकत्र काम करा.  सुनील शेळके मावळमध्ये असताना मी त्यांना उमेदवारी जाहीर केली होती.  मावळची जागा काही कारणास्तव जिंकता येत नव्हती. मात्र सुनिल शेळके यांच्या माध्यमातून जिंकता आली. उमेदवार कोणत्या जाती धर्माचा हे इथं पाहिलं जात नाही. आर आर पाटील यांचं उदाहरण आहे.  ते सर्वसामान्य कुटुंबातील आलेले असताना त्याना गृहमंत्री पदापासून ते अनेक मोठं पद देण्यात आली, असंही पवार म्हणाले. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget