एक्स्प्लोर

Ajit Pawar : छायाचित्र प्रदर्शनातून अजितदादांच्या जीवनप्रवासाचे दर्शन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भावना, सुनेत्रा पवार भावूक

Ajit Pawar Photo Exhibition : स्व. अजित पवार यांच्या 67 व्या जयंतीनिमित्त आयोजित 'अजित स्मृती अविट स्मृती' छायाचित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

Ajit Pawar Photo Exhibition : उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून दादांचा संपूर्ण जीवनप्रवास सुंदरपणे उलगडला गेला आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची झलक यातून पाहायला मिळते. या छायाचित्र प्रदर्शनातून त्यांच्या संपूर्ण जीवनपटाचे दर्शन होत असून आपल्या सर्वांच्या मनात त्यांच्या स्मृती कायम राहतील, अशी भावूक भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. यावेळी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यादेखील उपस्थित होत्या. 

उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या 67 व्या जयंतीचे औचित्य साधून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सभागृहात त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘अजित स्मृती अविट स्मृती’ या विशेष छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Devendra Fadnavis Ajit Pawar Tribute : मुख्यमंत्र्यांकडून अजितदादांच्या आठवणींना उजाळा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज या विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. या प्रदर्शनामुळे दादांच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या असून अजितदादांवर प्रेम करणाऱ्या आणि त्यांना मानणाऱ्या प्रत्येकाने हे छायाचित्र प्रदर्शन आवर्जून पाहावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

Ajit Smriti Avit Smriti Leaders Present : मंत्रिमंडळातील नेते आणि लोकप्रतिनिधींची उपस्थिती

या उद्घाटन सोहळ्याला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

याशिवाय आमदार शिवाजीराव गर्जे, सतीश चव्हाण, चंद्रदीप नरके, गोकुळ शिंदे, हिरामण खोसकर, माजी आमदार राजेश पाटील, गोकुळ संघाचे माजी चेअरमन अरुण डोंगरे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Tukaram Mundhe FDA : तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget