Baramati Agriculture News : होमिओपॅथिच्या औषधांचा वापर हा मानवाच्या उपचारासाठी केला जातो. पंरतु जर कुणी आपल्याला अस सांगितलं की, होमिओपॅथि औषधांचा वापर हा शेतीसाठी केला जात आहे, तर आपल्याला विश्वास बसेल का? बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात स्कॉच बोनेट या मिरचीच्या वाणाची लागवड करण्यात आली आहे. या संपूर्ण मिरचीवर होमिओपथीची औषधं वापरून वाढवण्यात आली आहेत. हा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग आहे. मिरचीची ओळख म्हणजे, तिचा तिखटपणा. परंतु ही मिरची चवीला तिखट नाही तर गोड लागते. त्याच मिरचीवर फवारणीसाठी आणि तिच्या वाढीसाठी संपुर्ण होमिओपॅथिची औषध फवारणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या मिरचीचा उत्पादन खर्च हा रासायनिक खतांच्या तुलनेत 3 पट कमी आहे.


आतापर्यंत आपण सर्वांनीच रासायनिक, जैविक, सेंद्रिय, एकात्मिक शेतीचे अनेक प्रयोग ऐकले आहेत. पण होमिओपॅथिक शेती, कधी ऐकलंय का? बारामतीत खरोखरच अशा प्रकारची होमिओपॅथिवरची शेती आकाराला येत आहे आणि ती यशस्वीही झाली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच बारामतीत नेदरलँडच्या स्कॉच बोनेट या जातीची गोड मिरची आणि ढोबळी मिरची होमिओपॅथि औषधावर यशस्वीरित्या उत्पादित करण्यात आली आहे.  


कर्नाटकातील होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. वीरेंद्र पाटील यांच्या संशोधित होमिओपॅथिक औषधी उपचार पद्धतीतून हे मिरचीचं पीक घेण्यात आलं आहे. सध्या वेगवेगळ्या रंगात लगडलेली मिरची याचा प्रत्यय देत आहे. याच होमिओपॅथि तंत्रज्ञानाचा वापर सर्वच पिकांवर होतो, असं डॉक्टर पाटील सांगतात. 




बारामतीतील शारदानगर येथील कृषी विज्ञान केंद्रात ही विविध रंगाची मिरची सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यातही अत्यंत कमी खर्चात ही मिरची उत्पादित करण्यात आले आहे. तसेच पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून त्यावर नायलॉन पेपर टाकण्यात आलाय. ज्याचा खर्च शेडनेट किंवा पॉलिहाऊस पेक्षा खूप कमी आहे. 


रोगाचा होमिओपथी औषधावर आधारीत तंत्रज्ञानाद्वारे केवळ वीस हजार रुपयात एका एकर मिरचीचे उत्पादन यशस्वीरित्या घेता येऊ शकते ते येथे दाखवून देण्यात आले आहे. 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात कृषी तंत्रज्ञान सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. याच दरम्यान होमिओपॅथिसह विविध प्रयोग शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञान सप्ताहामध्ये पाहायला मिळतील. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha