मुंबई : सरकारी नोकर होण्यासाठी आज महाराष्ट्रातील लाखो तरुण दिवसरात्र धडपड करत आहेत. सरकारी नोकरी भेटली नाही तरी खासगी क्षेत्रात चांगला पगार देणारी एखादी प्रतिष्ठेची नोकरी मिळावी, अशी अशा घेऊन हे तरुण कष्ट उपसत आहेत. राज्य तसेच केंद्र सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या अनेक पदांच्या भरती प्रक्रियेत गोंधळ उडाल्यामुळे या तरुणांमध्ये हतबलता आलीय. म्हणूनच एखाद्या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवली जात असेल तर तरुणांची झुंबड उडताना दिसतेय. असाच काहीसा प्रकार आज मुंबईतील एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनीत पाहायला मिळाला. या कंपनीकडून एकूण 2700 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेच्या पहिल्याच टप्प्यात 300 जागांसाठी तब्बल 3000 तरुण गोळा झाल्यामुळे येथे चांगलाच गोंधळ उडाला.


300 जागांसाठी होती भरती


पाहा संपूर्ण व्हिडीओ:



 


एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनीकडून सध्या वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण 2700 जागा भरल्या जाणार आहेत. टप्प्या-टप्प्याने ही भरती राबवली जाणार आहे. याच भरतीच्या पहिल्या टप्प्याचे आज आयोजन करण्यात आले होते.  या पहिल्या टप्प्यात एकूण 300 जागांसाठी परीक्षा घेतली जाणार होती. भरती फक्त 300 जागांसाठी होती. पण त्यासाठी तब्बल 3000 मुलं जमा झाली होती. अपेक्षेपेक्षा जास्त मुलं आल्यामुळे येथे काही काळासाठी गोंधळ निर्माण झाला होता.


3000 तरुण जमले, गोंधळाची स्थिती


एअर इंडियामध्ये कामगार भरती होत असल्याने सकाळी साडेआठ वाजता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर परीक्षार्थींची गर्दी झाली होती. त्यामुळे येथे काहीसा गोंधळ निर्माण झाला होता. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आहे. 3000 हजार मुले एकत्र जमले होते. त्यामुळे थोडासा गोंधळ होता. नंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या त्या ठिकाणी गर्दी नाही. मुंबई एअरपोर्ट गेट क्रमांक 5 बाहेर हा गोंधळ झाला होता. 


सध्या परिस्थिती नियंत्रणात


दरम्यान, सध्या या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पण फक्त 300 जागांसाठी तब्बल 3000 मुलं जमा झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तरुणांच्या गर्दीचा व्हिडीओ सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरतोय.  


हेही वाचा :


तारुण्यात पती वारला, दोनवेळच्या जेवणाची भ्रांत, संघर्षाचा डोंगर फोडून ठोंबरे काकूंनी लेकाला CA बनवलं!


'या' डिफेन्स स्टॉकवर ठेवा नजर, अर्थसंकल्पानंतर देऊ शकतात दमदार रिटर्न्स!


Vishalgad: शाहू महाराज विशाळगडावर, मशिदीत पाहणी; हिंसाचाराची धग सोसलेल्या महिलांनी छत्रपतींना पाहताच टाहो फोडला