एक्स्प्लोर
Advertisement
महाराष्ट्र मिलिटरी स्कूलची प्रवेश प्रक्रिया सुरु
ठाणे : महाराष्ट्र मिलिटरी स्कूलची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. पाचवी ते दहावीच्या इयत्तेसाठी फक्त मुलांसाठी निवासी स्कूल आहे. मुरबाडमधील तळवली, टोकावडे परिसरात निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या या निवासी शाळेत केवळ मुलांनाच इंग्रजी माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते.
हॉकी, नेमबाजी, धनुर्विद्या, मुष्टियुद्ध, वेटलिफ्टिंग आदी खेळांमध्ये राज्य व राष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठीही मिलिटरी स्कूलची ओळख आहे. संस्थेचे संचालक रणजित सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा कारभार सुरू आहे.
पाचवी ते दहावीपर्यंत ही शाळा असून शालेय अभ्यासक्रम शिकवण्याबरोबरच सैनिकी प्रशिक्षण, स्वयंसंरक्षण, रायफल शूटींग, साहसी खेळ, कराटे, मुष्टियुद्ध इत्यादी विविध स्वरूपांचे प्रात्याक्षिकांसह विद्यार्थ्यांना दिले जाते. हॉकीच्या खेळासाठी या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावरील मैदानाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे हे मैदान विविध स्पर्धांसाठी एक मोठे आकर्षण ठरले आहे.
या ठिकाणच्या अनेक विद्यार्थ्यांनी मुष्टियुद्ध व हॉकी या खेळांमध्ये राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. त्याचबरोबर पहिल्यांदाच राज्यात डिजिटल वर्गाच्या माध्यमातून सैनिकी शाळांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम देखील संस्थेच्या वतीने राबवण्यात आला.
निवृत्त लष्करी अधिकारीदेखील नियमितपणे या ठिकाणी येऊन विद्यार्थ्यांना विविध तंत्र शिकवत असतात. केवळ मुंबई, ठाणे किंवा महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभऱातून या ठिकाणी विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement