एक्स्प्लोर

आर्थिक टंचाई आणि फसवणुकीतून अभिनेत्रीची आत्महत्या, आत्महत्येपूर्वी केलं फेसबूक लाईव्ह

फेसबुक लाईव्हमध्ये अनुपमाने "कुणावर विश्वास ठेवू नका, असं सांगितले होते. तसेच तिला कशाप्रकारे फसवण्यात आले यावरही ती बोलली आहे.

वसई : सिनेसृष्टी पुन्हा एकदा हादरली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कलाकारांच्या आत्महत्यांचं सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाही. अभिनेता सुशांत सिंग राजपूत, टीव्ही अभिनेता समीर शर्मा यांच्यानंतर आणखी एका भोजपुरी अभिनेत्रीने आत्महत्या करून आपलं जीवन संपवल्याचं समोर आलं आहे. आर्थिक विवंचना आणि झालेली फसवणुकीवरून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.

भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठक हिने आपल्या काशिमिरा येथील राहत्या घरी पंख्याला लटकून आत्महत्या केली आहे. घटना 2 ऑगस्टची आहे. आत्महत्येपूर्वी अनुपमा यांनी सुसाइड नोटही लिहून ठेवली होती. अनुपमा ही 40 वर्षांची होती. ती भोजपूरी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होती. आत्महत्या करण्यापूर्वी रात्री 12 च्या दरम्यान तिने फेसबुक लाईव्ह ही केलं होतं. तिने आपल्या फॅन्ससोबत संवादही साधला होता. या फेसबुक लाईव्हमध्ये अनुपमाने "कुणावर विश्वास ठेवू नका, असं सांगितले होते. तसेच तिला कशाप्रकारे फसवण्यात आले यावरही ती बोलली आहे. अनुपमाच्या फ्लॅटमधून पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली असून, यामध्ये तिने आत्महत्येची दोन कारणे सांगितली आहेत.

आर्थिक टंचाई आणि फसवणुकीतून अभिनेत्रीची आत्महत्या, आत्महत्येपूर्वी केलं फेसबूक लाईव्ह

''माझ्या एका मित्राच्या सांगण्यावरून मी मालाडच्या विस्डम प्रोड्युसर कंपनीमध्ये दहा हजार रुपये गुंतवले आहेत. ती कंपनी मला हे पैसे डिसेंबर 2019 मध्ये देणार होती. मात्र आता टाळाटाळ केली जात आहे.'' तिला ही दुसऱ्यांना पैसे द्यायचे होते. तर दुसरं अनुपमाने या चिठ्ठीमध्ये एका पत्रकार मनीष झा याचेही नाव घेतले आहे. अनुपमा यांनी मनीष झा याला लॉकडाऊनमध्ये गावी जाण्यास निघताना, स्कूटर दिली होती. गावाहून परतल्यानंतर तिने झा कडून स्कूटर परत मागितली होती, मात्र तो देत नव्हता. तिला नवीन काम करायचं होतं. तिच्याकडे रिक्षासाठीही पैसे नव्हते, त्यामुळे स्कूटर तिला हवी होती.

BLOG | आत्महत्या कधी थांबायच्या?

अनुपमा या आपल्या पती बरोबर गावी गेल्या होत्या. दहा दिवसापूर्वी त्या एकट्या काशिमिराच्या आपल्या घरी परत आलेल्या. फेसबुक लाइव्ह नंतर तिने रात्री आपल्या शेजाऱ्यालाही कॉल केला होता. अनुपमा अत्यंत शांत स्वभावाची असल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं आहे.

2018 साली तिच्या 15 वर्षाच्या मुलीनेही आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. या लॉकडाऊन दरम्यान ती आर्थिक विवंचनेत होती. तिला काहीचे पैसे द्यायचे होते. सध्या पोलिसांनी भादवि कलम 306 अन्वये मनीष झा आणि विस्डम कंपनीचे प्रोड्युसर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून, पुढील तपास करत आहेत. सध्या याप्रकरणात कुणालाही अटक करण्यात आली नाही.

संबंधित बातम्या

Exclusive | काय आहे त्या रात्रीचं सत्य? ज्या रात्री दिशाने आत्महत्या केली?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08PM 14 January 2025ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 14 January 2025Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलंAjit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
Embed widget