एक्स्प्लोर

भूमाफियांकडून कोरोना काळात केलेल्या 9 हजारहून अधिक अनधिकृत बांधकामांवर पालिकेची कारवाई

सरासरी काढल्यास दर महिन्याला सरासरी 796 तर दररोज 26 अनधिकृत बांधकामे उभारण्यात आल्याचे चित्र समोर येते

मुंबई : मुंबईत मार्च 2020 पासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. आजही कोरोना नियंत्रणात असला तरी प्रादुर्भाव कायम आहे. पालिका यंत्रणा कोरोनाशी दोन हात करण्यात व्यस्त राहिल्याने दुसरीकडे या संधीचा लाभ उठवून काही भूमाफियांनी गेल्या वर्षभरात अनधिकृत बांधकामे सुसाट वेगाने उभारल्याचे पालिकेनेच माहितीच्या अधिकारात आरटीआय कार्यकर्ते शकील शेख यांना दिलेल्या उत्तरात उघडकीस आले आहे. 

25 मार्च 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत मुंबई महापालिकेकडे 24 प्रभागात अनधिकृत बांधकामांबाबत एकूण 13 हजार 325 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 3 हजार 767 तक्रारी या दुबार स्वरूपाच्या असल्याने प्रत्यक्षात अनधिकृत बांधकामांची संख्या 9 हजार 558 एवढी आहे. याबाबतची सरासरी काढल्यास दर महिन्याला सरासरी 796 तर दररोज 26 अनधिकृत बांधकामे उभारण्यात आल्याचे चित्र समोर येते.

तुफानी फटकेबाजी करत पृथ्वी शॉनं मोडला विराट, धोनीचा विक्रम 

कुर्ला येथे सर्वाधिक 2002 अनधिकृत बांधकामे ; फक्त 52 प्रकरणात कारवाई 

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक अनधिकृत बांधकामे कुर्ला येथे आहेत. या विभागात अनधिकृत बांधकामांबाबत 3 हजार 251 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 1 हजार 249 तक्रारी दुबार असल्याने अनधिकृत बांधकामांची संख्या 2002 एवढी आहे. मात्र याउलट फक्त 52 प्रकरणात अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अत्यंत कासवगतीने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत असल्याचे सांगत शकील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

9558 पैकी केवळ 466 अनधिकृत बांधकामांवर कारवाई 

मुंबईतील 24 प्रभागात अनधिकृत बांधकामांची संख्या ही 9 हजार 558 एवढी असून पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने त्यापैकी केवळ 466 अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आरटीआय कार्यकर्ता शकील यांनी पालिकेच्या या मंदगतीने सुरू असलेल्या कारवाईबाबत संताप व्यक्त केला आहे. एकीकडे कंगना सारख्या अभिनेत्रींच्या अनधिकृत बांधकामांबाबत पालिका जाणीवपूर्वक कारवाई करते व प्रकरण कोर्टात गेल्यास खासगी वकिलांवर लाखो रुपये उधळते. तर मग या भूमाफियांचा अनधिकृत कामांवर कारवाई करताना पालिकेच्या संबंधित अधिकार्यांच्या हाताला लकवा मारतो का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

       वार्ड        अनधिकृत      कारवाई
                      बांधकामे 
 
        ए                24                 1
        बी             182                  2
       सी             389                  24 
         डी             78                  15
         ई               436                0
   एफ/उत्तर          90                 9
    एफ/ दक्षिण     214               3
    जी/ उत्तर          150              7
    जी/दक्षिण         122            15
     एच/ पूर्व           232           11
    एच/ पश्चिम        429            21
    के/पूर्व               395           33
     के/पश्चिम          302            58
      एल                 2002          52
     एम/पूर्व             1174           8
     एम/ पश्चिम        678            33
      एन                   240             4
     पी/ उत्तर            342            62
     पी/दक्षिण           233            4
     आर/उत्तर           505            14
      आर/दक्षिण        314            75
      आर/ मध्य          196            4
     एस                     552            8
       टी                     240            3   
          
     एकूण                9558        466

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget