एक्स्प्लोर

Accident : मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू; वाहनचालकाचा ताबा सुटल्यानं अपघात 

मुंबई-नाशिक महामार्गावर रात्रीच्या सुमारास भीषण आपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

Accident : मुंबई-नाशिक महामार्गावर रात्रीच्या सुमारास भीषण आपघात (Accident) घडला. वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असून, या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. मौजम फायाजऊल्ल हुसेन अन्सारीव (वय 31) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर चैतन्य  कासने (वय 24) , नशिर अली अबु अन्सारी (वय 33) , जयेश बाळाराम सपाट (वय 25) असे जखमींचे नावे आहेत. 

सुदैवाने कारमधील प्रवासी बचावले

मुंबई-नाशिक महामार्गावर पडघा नजिक खडवली फाट्याजवळ कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याने कार चारकाला मागच्या बाजूस जोरदार धडक दिली. त्यानंतर या कंटेनर चालकाने कारला फरफटत नेत रस्त्याच्या कडेला असलेल्या एका आईस्क्रीमच्या टेम्पोला जोरदार धडक दिली. कंटेनर चालकाने फरफटत आणलेली कार आणि कंटेनर आईस्क्रीमच्या टेम्पोला धडकल्याने आईस्क्रीम खात उभे असलेले तीन ते चार जण दुचाकीसह चिरडले गेले. या भीषण अपघातात दोन ते तीन दुचाकी आणि एक कार आणि आईस्क्रीमच्या टेम्पोचं मोठं नुकसान झालं आहे. यामध्ये एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण या दुर्घटनेत गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कारच्या मागच्या बाजूस कंटेनरची धडक बसल्याने सुदैवाने कारमधील प्रवासी बचावले आहेत. 

दरम्यान, या भीषण अपघातानंतर पळून गेलेल्या कंटेनर चालकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या संदर्भात पडघा पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमकरता शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तसेच या संपूर्ण घटनेची चौकशी पडघा पोलीस करीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

Dhule News : धुळ्यातील दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांना अपघातांचा विळखा? चार वर्षांत 887 अपघात, तर 278 मृत्यू

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

भाजपने रचलेल्या पापात आपण का भागीदार व्हायचं? डिलिमिटेशनच्या विरोधात मतदान करावं, रोहित पवारांचे थेट सुप्रिया सुळेंना पत्र
भाजपने रचलेल्या पापात आपण का भागीदार व्हायचं? डिलिमिटेशनच्या विरोधात मतदान करावं, रोहित पवारांचे थेट सुप्रिया सुळेंना पत्र
Uddhav Thackeray on Delimitation: ठाकरेंच्या शिवसेनेचा डिलिमिटेशनला विरोध का? उद्धव ठाकरेंनी सांगितलं राजकारण, ज्ञानेशकुमारांचं घेतलं नाव
ठाकरेंच्या शिवसेनेचा डिलिमिटेशनला विरोध का? उद्धव ठाकरेंनी सांगितलं राजकारण, ज्ञानेशकुमारांचं घेतलं नाव
मलाही जाता आले नसते का? पवार साहेबांनींही देशहिताचा विचार करावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन, म्हणाले, 850 खासदार केले तर खर्च किती वाढणार? कोणाला झेपणार?
मलाही जाता आले नसते का? पवार साहेबांनींही देशहिताचा विचार करावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन, म्हणाले, 850 खासदार केले तर खर्च किती वाढणार? कोणाला झेपणार?
ठाकरेंच्या शिवसेनेचे शिल्लक राहिलेले खासदारही फुटणार आहेत; उदय सामंतांचं मोठं वक्तव्य, संजय राऊतांवर पलटवार
ठाकरेंच्या शिवसेनेचे शिल्लक राहिलेले खासदारही फुटणार आहेत; उदय सामंतांचं मोठं वक्तव्य, संजय राऊतांवर पलटवार

व्हिडीओ

Majha Katta Sanjay Mone Ashok Mulye : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, अभिनेता संजय मोने माझा कट्ट्यावर
Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर 
सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर
मलाही जाता आले नसते का? पवार साहेबांनींही देशहिताचा विचार करावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन, म्हणाले, 850 खासदार केले तर खर्च किती वाढणार? कोणाला झेपणार?
मलाही जाता आले नसते का? पवार साहेबांनींही देशहिताचा विचार करावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन, म्हणाले, 850 खासदार केले तर खर्च किती वाढणार? कोणाला झेपणार?
Delimitation : इंडिया आघाडीचे नेते आणि स्टॅलिन यांच्यात बैठक सुरु, द्रमुक निर्णयाचा फेरविचार करणार? राहुल गांधी आणि स्टॅलिन यांच्या गळाभेटीचा फोटो समोर
इंडिया आघाडीचे नेते आणि स्टॅलिन यांच्यात बैठक सुरु, द्रमुक निर्णयाचा फेरविचार करणार? देशाचं लक्ष चेन्नईकडे लागलं
Nagpur Crime News: 8 वर्षीय चिमुरडीवर 60 वर्षीय नराधम वृद्धाकडून अत्याचार; हात पाय तोडण्याची दिली धमकी अन्..., नागपुरातील शॉकींग घटना
8 वर्षीय चिमुरडीवर 60 वर्षीय नराधम वृद्धाकडून अत्याचार; हात पाय तोडण्याची दिली धमकी अन्..., नागपुरातील शॉकींग घटना
Devendra Fadnavis Delimitation Bill: शरद पवारांच्या मनधरणीसाठी काँग्रेस नेते मुंबईत; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला
शरद पवारांच्या मनधरणीसाठी काँग्रेस नेते मुंबईत; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला
ठाकरेंच्या शिवसेनेचे शिल्लक राहिलेले खासदारही फुटणार आहेत; उदय सामंतांचं मोठं वक्तव्य, संजय राऊतांवर पलटवार
ठाकरेंच्या शिवसेनेचे शिल्लक राहिलेले खासदारही फुटणार आहेत; उदय सामंतांचं मोठं वक्तव्य, संजय राऊतांवर पलटवार
वर्षभरानंतर ओंकार हत्ती कुटुंबात पोहोचला, कळपाशी मनोमिलन, सिंधुदुर्ग गोवा भटकंती 'आपल्या प्राण्यांत'
वर्षभरानंतर ओंकार हत्ती कुटुंबात पोहोचला, कळपाशी मनोमिलन, सिंधुदुर्ग गोवा भटकंती 'आपल्या प्राण्यांत'
Solapur Crime News: मध्यरात्री दीडच्या सुमारास सख्ख्या भावानेच भावावर कुऱ्हाडीने वार केले; सोलापुरातील तरूणाचा मृत्यू, कारणंही समोर, नेमकं काय घडलं?
मध्यरात्री दीडच्या सुमारास सख्ख्या भावानेच भावावर कुऱ्हाडीने वार केले; सोलापुरातील तरूणाचा मृत्यू, कारणंही समोर, नेमकं काय घडलं?
Embed widget