एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 04/02/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 04/02/2018
1. मी कासव होईन, पण धरणात लघुशंका करणारा अजित पवार नाही, उद्धव ठाकरेंकडून अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार https://goo.gl/DhrQVh तर आधी डल्ला मारला, आता हल्लाबोल करत आहेत, औरंगाबादेतही राष्ट्रवादीवर निशाणा https://goo.gl/JdnqSa
2. चंद्राबाबू नायडूंचा उद्धव ठाकरेंना फोन, एनडीए सोडण्यावर दोघांमध्ये चर्चा, ‘टाईम्स’च्या बातमीने राजकीय वर्तुळात खळबळ https://goo.gl/hmbfec तर भाजपसोबतच्या मतभेदांवर तोडगा काढू, टीडीपी नेते चौधरींचं स्पष्टीकरण https://goo.gl/aR8jFZ
3. मी तोंड उघडलं, तर शरद पवारांची पळताभूई थोडी होईल, भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा इशारा, राष्ट्रवादीपेक्षा डाव्यांसोबत जाण्याचा निर्णय https://goo.gl/8PVaxX
4. विरोधक अजून पुढचे 10 वर्षे सत्तेपासून लांब, मुख्यमंत्र्यांना विश्वास, तर भाजपकडून चुका होतील, पण बेईमानी होणार नसल्याचाही दावा https://goo.gl/YKT6pm
5. बोगस प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवणाऱ्यांना 7 महिन्यात कामावरुन कमी करा, सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला आदेश, 11,700 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार https://goo.gl/hE1KDZ
6. डी. एस. कुलकर्णींविरोधात गुंतवणूकदार सुप्रीम कोर्टात जाणार, डीएसकेंच्या मालमत्तांचा लिलाव करुन पैसे परत मिळवण्यासाठी राज्य सरकार आणि आरबीआयकडे पाठपुरावा करण्याचाही निर्णय https://goo.gl/pyNQVi
7. मतांच्या सौदागरांमुळे तिहेरी तलाक विधेयक रखडलं, भाजपचे खासदार गिरीराज सिंह यांचा शरद पवारांवर निशाणा https://goo.gl/hNhPSC
8. गोपीनाथ मुंडेंना भाजपने त्रास दिला असेल, तर ते आमचं आम्ही पाहून घेऊ, पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडेंना प्रत्युत्तर https://goo.gl/NaSLFa
9. मध्यमवर्गीयांना चार वर्षात बरंच काही दिलं, यंदाचा अर्थसंकल्प गरीब आणि शेतकऱ्यांचा, अर्थसंकल्पानंतर अरुण जेटलींची पहिलीच एक्स्क्लुझिव्ह मुलाखत https://goo.gl/22GPcy
10. समृद्धी महामार्गासाठी जमीन दिलेल्या 90 वर्षीय आजीबाईंना अखेर न्याय, एबीपी माझाच्या बातमीनंतर मोबदला बँक खात्यात जमा https://goo.gl/QkbMmk
11. लग्न मोडल्याच्या नैराश्यातून नाशिकमध्ये इंजिनिअर तरुणाची आत्महत्या, खिडकीच्या गजाला नायलॉन मांजाने गळफास घेत आयुष्य संपवलं https://goo.gl/n4Pm8H
12. जुन्नरमध्ये विजेची तार तुटल्याने ऊसाच्या फडाला आग, बिबट्याच्या तीन पिल्लांचा होरपळून मृत्यू https://goo.gl/c1K7mR
13. केरळच्या विधानसभा अध्यक्षांच्या चष्म्याचा खर्च सरकारी तिजोरीतून, 50 हजारांचं बिल राज्य सरकारने भरलं, आरटीआयमधून माहिती समोर https://goo.gl/ESYuie
14. पाच बॉलची ओव्हर, षटकार मारला की बाद, अहमदनगरमध्ये वुमेन्स प्रीमिअर लीगचा थरार https://goo.gl/mfnWs6
15. सेन्चुरियनच्या वन डेत टीम इंडियाकडून दक्षिण आफ्रिकेचा नऊ विकेट्सनी धुव्वा, चहल आणि यादवच्या फिरकीनं दक्षिण आफ्रिकेची दाणादाण https://goo.gl/fmL5HG
BLOG : सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग : 'घायल' आणि 'घातक' : तत्कालिन भारतीय असंतोषाचे प्रतीक https://goo.gl/Wyo9Az
माझा कट्टा : सीआयडीच्या 20 वर्षांच्या प्रवासाचे खुमासदार किस्से, अभिनेते शिवाजी साटम यांच्याशी मनमोकळ्या गप्पा, आज रात्री 8 वाजता एबीपी माझावर...
एबीपी माझाचे अपडेट सुपरफास्ट मिळवण्यासाठी फेसबुकवर हा छोटा बदल करा https://goo.gl/NzW5bs
एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement