एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 31/03/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 31/03/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 31/03/2018 1. रेल्वे आणि मेट्रोचे डबे बनवणारा महाराष्ट्रातील पहिला कारखाना लातुरात, रेल्वेमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमीपूजन, 500 कोटींच्या प्रकल्पातून 25 ते 30 हजार रोजगारांचा दावा https://goo.gl/KbZwKm 2. सांगली महापालिकेत काँग्रेस नगरसेविकेचा राडा, दगडाने डोकं फोडून घेण्याचा प्रयत्न, विकासकामं रखडवल्याचा आयुक्तांवर आरोप https://goo.gl/jhMZCg 3. आमदारपुत्राच्या साडे तेरा कोटींच्या कर्जाचं ओझं दोन शेतकऱ्यांवर, सोलापुरातील माढा तालुका प्रशासनाचा पराक्रम, एबीपी माझाच्या बातमीनंतर कर्जाचं ओझं सातबारावरुन उतरवण्याचं आश्वासन https://goo.gl/yD3vMH 4. नागपुरात मेट्रोच्या कामावेळी लोखंडी फ्रेम कोसळली, ब्रिजखाली पार्क केलेल्या कारचा चक्काचूर, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही https://goo.gl/MxQQ77 5. एअर इंडियाची विक्री महाघोटाळ्याची सुरुवात असेल, सुब्रमण्यम स्वामींचा भाजप सरकारला घरचा आहेर, तर सर्व प्रकरणावर लक्ष ठेवून असल्याचाही इशारा https://goo.gl/tVP4ed 6. मोदी सरकारच्या नाकी दम आणण्यासाठी नव्या हालचाली, नाराज नेते यशवंत सिन्हांची काँग्रेस आणि भाजप बंडोखोरांसोबत बैठक, अराजकीय मंचाची स्थापना करण्याचा निर्णय https://goo.gl/GHqt67 7. उद्यापासून सर्व बिलं महागणार, नव्या आर्थिक वर्षात कररचनेसह अनेक गोष्टीत महत्वाचे बदल, आयकरावर एक टक्का उपकर लागू https://goo.gl/KEhj6E 8. ‘टीम राहुल’मध्ये खासदार राजीव सातव यांच्यानंतर आणखी एक मराठी चेहरा, आमदार यशोमती ठाकूर यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी वर्णी https://goo.gl/CDddm7 9. पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशींचं डूडल, गुगलकडून आदरांजली https://goo.gl/QmfLhz तर केईएम रुग्णालयाचे नाव बदलून डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालय करा, मनसेची मागणी https://goo.gl/d5CinJ 10. अन्याय आणि शोषणमुक्तीसाठी लढणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणेचं केंद्र, सरसंघचालक मोहन भागवत यांचे उद्गार, रायगडावर शिवपुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम संपन्न https://goo.gl/fdCP3G 11. मिलिंद एकबोटेंच्या कुटुंबाला तोफेच्या तोंडी द्या, पुण्यात वृत्तपत्राच्या कात्रणातून धमकी, एकबोटे कुटुंबियांकडून संरक्षणाची मागणी https://goo.gl/bqsdst 12. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कुंचल्यातून पुन्हा एकदा ‘मोदी-शाह’ जोडीवर निशाणा, बॉल टॅम्परिंगच्या अनुषंगाने नवं व्यंगचित्र प्रसिद्ध https://goo.gl/To7j3Y 13. मुंबईत मध्यरात्री पश्चिम रेल्वे मार्गावर, तर उद्या मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक https://goo.gl/wEvYdm 14. मालवणच्या समुद्रकिनारी तब्बल 30 फूट लांबीचा देवमासा मृतावस्थेत, एक ते दीड किमी परिसरात दुर्गंधी, देवमाशाच्या विल्हेवाटीचं प्रशासनासमोर आव्हान https://goo.gl/vHveLb 15. रिलायन्स जिओची ग्राहकांना खास भेट, प्राईम युजर्सना पुढील एक वर्ष जिओची प्राईम ऑफर मोफत मिळणार https://goo.gl/8b149h PHOTO : प्रेमात पडाल असा भोगवे बीच... पाहा निसर्गाची किमया फक्त एका क्लिकवर... https://goo.gl/MwMgM8 माझा कट्टा : शिवरायांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्यासोबत खास गप्पा, पाहा आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर EXCLUSIVE : आयसीआयसीआय बँक आणि व्हिडीओकॉनमधील कथित वादग्रस्त व्यवहारांवर काय बोलले वेणुगोपाल धूत? एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत रात्री 8.30 वाजता http://abpmajha.abplive.in/ एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
आणखी वाचा























