ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मे 2025 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी सुरुच; केंद्र सरकारकडून पाकिस्तानातून होणारी आयात बंद, पाकच्या अर्थव्यवस्थेला तगडा झटका बसणार https://tinyurl.com/3jt7xv37 भारताने सिंधू नदीवर धरण बांधून पाणी अडवलं तर हल्ला करु, पाकिस्तानचा संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफची पोकळ धमकी https://tinyurl.com/2swe7ha9
2. पाकिस्तानचं टेन्शन वाढलं, भारताच्या फायटर जेट्सकडून थेट एक्स्प्रेस वेवर पहिल्यांदाच नाईट लँडिंग, हवाई दलानं शक्ती दाखवली https://tinyurl.com/3y7abhe7 पाकिस्तान बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीच्या तयारीत; भारताला चिथावणी देण्याचा पाकचा नापाक इरादा https://tinyurl.com/5n8y7xpb दहशतवादी हाशिम मुसा काश्मीरच्या जंगलात लपल्याची शक्यता, पाकिस्तानातील सूत्रधारांशी संवाद साधण्यासाठी अॅल्पाईन क्वेस्ट मोबाईल अॅप आणि चिनी बनावटीच्या अत्याधुनिक कम्युनिकेशन यंत्रणेचा रस्ते शोधण्यासाठी वापर https://tinyurl.com/45sjswmm
3. गोव्यातील शिरगावच्या 'श्री लईराई जत्रे'दरम्यान चेंगराचेंगरी, 7 जणांचा मृत्यू; 70 जण जखमी https://tinyurl.com/5n8dya55
4. लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात, दोन दिवसात सर्व पात्र महिलांना पैसे मिळणार https://tinyurl.com/yu4scac8 लाडकी बहीण साठी सामाजिक न्यायचे 410 कोटी अन् आदिवासी विकास विभागाचे 335 कोटी महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग केल्यानं वाद,सामाजिक खात्याची आवश्यकता नसेल तर खातं बंद केले तरी चालेल, मंत्री संजय शिरसाटांचा संताप,https://tinyurl.com/368m8bvk तोंड दाबून बुक्क्याचा मार आमच्यातल्या गद्दार लोकांना सहन करावा लागतोय, हे कसले वाघ, अंबादास दानवेंनी संजय शिरसाटांना डिवचलं https://tinyurl.com/7yvywuf7
5. अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून माजी मुख्यमंत्र्यांचा सत्काराचा कार्यक्रम; मविआच्या माजी मुख्यमंत्र्यांची पाठ,महायुतीशी संबंधित पक्षाचा कार्यक्रम असल्यानं जाणार नाही,शरद पवारांची भूमिका स्पष्ट https://tinyurl.com/mt68dzrd तुम्ही 2019 साली शिवसेनेसोबत गेलात,मग भाजप का चालत नाही? अजित पवारांचा नाव न घेता शरद पवारांना सवाल https://tinyurl.com/59nswwc4
6. शरद पवारांनी अमित शाहांचा राजीनामा का मागितला नाही? संजय राऊतांचा थेट सवाल, अमित शाहांच्या राजीनाम्याची नरेंद्र मोदींकडे मागणी https://tinyurl.com/ynxzeapz
7. संपूर्ण महाराष्ट्राला अवकाळी पुन्हा झोडपणार, येत्या चार दिवसात कोकणपट्ट्यासह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अवकाळी पावसाचा अंदाज, विदर्भ ते पश्चिम महाराष्ट्र तापमान 40 अंश सेल्सिअसवर https://tinyurl.com/y2mphuz9
8. पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी नराधम दत्ता गाडेचा फोन अश्लील व्हिडीओंनी भरलेला,एका वर्षात 22 हजार व्हिडीओ पाहिले, गुगल सर्च हिस्ट्रीतून माहिती समोर https://tinyurl.com/3w9yb9es
9. पुण्यात पुन्हा ‘हिट अँड रन’; भरधाव मर्सिडीज कारनं दुचाकीस्वाराला उडवलं, चिंचवडच्या तरुणाचा जागीच मृत्यू,दोन जखमी,नवले पुलावर दिवसभरात तीन अपघात https://tinyurl.com/yc8hn4b5
10. आयपीएलमध्ये आज धोनी अन् विराट कोहली आमने सामने येणार, चेन्नईकडे आरसीबीचा हिशोब पूर्ण करण्याची संधी, बंगळुरुत हाय व्होल्टेज लढत रंगणार https://tinyurl.com/4zazt5xe
एबीपी माझा स्पेशल
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला महाराष्ट्र सरकारचा विरोध, वकिलांची आणि जलतज्ज्ञांची फौज उभी करू,मंत्री प्रकाश आबिटकरांचा कर्नाटकला इशारा https://tinyurl.com/3avp4rcr
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
























