मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला (Sanjay gandhi National Park)  लागून असलेलं आरे (Aarey Forest) हे मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे जंगल आहे. हे जंगल मुंबईचे (Mumbai Forest)  फुफ्फुस म्हणून ओळखलो जाते याच जंगलामुळे मुंबईतील तापमान नियंत्रणात राहण्यास मदत मिळाली आहे. मात्र या जंगलातून अलीकडे वाहनांची संख्या अधिक वाढली असून वायू प्रदूषणात (Air Pollution)  मोठी भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर आरेतून जाणाऱ्या वाहनांवर लवकरच आता ‘ग्रीन’ टोल (Aarey Green Toll)  आकारण्यात येणार आहे.  वनविभाग आरेच्या जंगलातून प्रवास करणाऱ्या वाहनांवर टोल लावण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. 


आरे शहराच्या मध्यभागी असणारं हे जगातील पहिलंच जंगल ठरणार आहे.  राष्ट्रीय उद्यानाला लागून आरे आहे. आरे कॉलनी मार्गावरुन दररोज 25 हजार हून अधिक वाहनांची ये-जा होते. आरेच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात गाड्यांची ये-जा या मार्गावरुन होत असते त्यामुळे वायू प्रदूषणात मोठी भर पडते. वनविभागाने या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ग्रीन टोल लागू करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यामुळे  इको सेन्सेटिव्ह झोन असलेल्या आरे परिसरात प्रवेश करणाऱ्या वाहनांची संख्या कमी होण्यास मदत होईल.  पर्यावरण प्रेमींनी या निर्णयाचं  स्वागत केलं असून यामुळे मुंबईतील पर्यावरणाचं संरक्षण होण्यास हातभार लागणार आहे. 


कर लावण्याचे वनविभागाला अधिकार


इको-सेन्सिटिव्ह झोनमधून प्रवास करणाऱ्यांकडून हा टोल आकारण्यात येण्यासंदर्भात हा प्रस्ताव आहे. आरेतील रहिवाशांकडून टोल आकरण्यात येणार नाही.  यासंदर्भात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिकारी पालिका प्रशासनाला आपल्या हेतूबद्दल सांगणार असल्याची माहिती  मिळाली आहे. 2014 आधी देखील अशाप्रकारचा टोल होता, मात्र आरे कॉलनीतील मुख्य रस्ता पालिकेच्या अखत्यारीत आल्यानंतर टोल बंद करण्यात आला होता . जंगलातून रस्ता जात असल्यास वनविभागाला कर लावण्यासंदर्भात अधिकार असतो, त्यामुळे वनविभागाकडून हा प्रस्ताव पुढे करण्यात आला आहे .


वनविभागाने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत पर्यावरण प्रेमींकडून स्वागत


आरेचे हे जंगल 3 हजार एकर जमिनीवर पसरलेले आहे. पाच लाखांहून अधिक झाडे या परिसरात आहेत. यामुळे मुंबईतील पर्यावरणाचं संतुलन राहण्यास मदत मिळते. त्यातील 600 एकर जमिनीवरील जंगलाचं संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी वनविभागाने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत पर्यावरण प्रेमींनी केलं आहे. 


हे ही वाचा : 


Mumbai Air Quality : मुंबईकरांसाठी सुटकेचा नि:'श्वास'! अवकाळी पावसामुळे हवेची गुणवत्ता सुधारली