Mumbai Air Pollution : मुंबईकरांसाठी (Mumbai News) एक चांगली बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून बिघडलेली मुंबईतील हवेची गुणवत्ता (Mumbai Air Quality) आता सुधरताना दिसत आहे. मुंबईतील अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) मुंबईकरांची (Mumbai Rain Updates) तारांबळ उडाली असली, तरी हवेची गुणवत्ता (Mumbai Air Pollution) सुधारण्यास मात्र मदत झाली आहे. रविवारी मुंबई उपनगरासह राज्यातही विविध ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. यामुळे मुंबईतील ठासळलेली हवेची पातळी (Mumbai Air Quality Index) आता कुठे पुर्वपदावर येताना दिसत आहे.


मुंबईची हवा सुधारली


दिवाळीपूर्वी मेट्रो आणि इतर बांधकाम आणि त्यानंतर दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी यामुळे मुंबईतील हवेचा दर्जा घसरला होता. पण, आता अवकाळी पावसानंतर मुंबईच्या हवा गुणवत्तेत सुधारणा होताना पाहायला मिळत आहे. मुंबईतील बीकेसी वगळता सर्व भागातील AQI 100 च्या खाली आहे. बीकेसीचा AQI 103 वर आहे. आज देखील मुंबई मुंबईत अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे, पुढील तीन ते चार दिवस मुंबईतील हवा गुणवत्ता चांगल्या स्थितीत राहणार आहे. 


मुंबईतील हवेची गुणवत्ता



  • एकूण मुंबई - 60 AQI

  • कुलाबा - 76

  • भांडुप - 37

  • मालाड - 35

  • माझगाव - 47

  • वरळी - 33

  • बोरिवली - 65

  • बीकेसी - 103

  • चेंबूर - 89

  • अंधेरी - 67

  • नवी मुंबई - 53


हवेचा गुणवत्ता निर्देशांक किती असावा?


शून्य ते 50 एक्यूआय - उत्तम


50 ते 100 एक्यूआय - समाधानकारक


101 ते 200 एक्यूआय - मध्यम


201 ते 300 एक्यूआय - खराब


301 ते 400 एक्यूआय - अतिशय खराब


401 ते 500 एक्यूआय - गंभीर


दिवाळीत हवेची गुणवत्ता बिघडली


दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबईची हवा बिघडली होती. लक्ष्मीपूजनाच्या (Laxmi Pujan) दिवशी 24 तासांत मुंबईत तब्बल 150 कोटी रुपयांचे फटाके फुटल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता (AQI) पातळी खालावली होती. मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी 288 वर जाऊन पोहोचली होती. आता हळूहळू मुंबईतील हवेचा दर्जा सुधारत आहे.


मुंबईसह मुंबई उपनगरात गेल्या महिनाभरात प्रदूषणात वाढ झाली आहे. मात्र, आता अवकाळी पावसामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता काहीशी नियंत्रणात येताना दिसत आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाकडून बांधकामे स्थगित करण्यासाठीचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे दिवाळी आधी मुंबईच्या हवेची पातळी काहीशी सुधारली होती. पण, दिवाळीमध्ये हवेची पातळी पुन्हा घसरली आहे. त्यानंतर आता पुन्हा झालेल्या पावसामुळे हवेची गुणवत्ता सुधारत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Maharashtra Weather : मुंबईसह उपनगर, ठाणे आणि पालघरला येलो अलर्ट, पुढील 48 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता