एक्स्प्लोर
पाकशी चर्चा, मग विद्यार्थ्यांशी का नाही? आदित्य ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल
मुंबई : सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे लावण्याऐवजी त्यांच्यासोबत बसून चर्चा का करत नाही?, असा सवाल करत युवासेना प्रमुख आदित्या ठाकरेंनी मोदी सरकारवर घणाघात केला आहे. तसेच, मुंबई गणेश पांडे प्रकरणावरुनही आदित्य ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला.
“पाकशी चर्चा, मग विद्यार्थ्यांशी का नाही?”
“जर सरकार पाकिस्तानशी पाठणकोट हल्ल्याची चर्चा करू शकते, जर पीडीपीसोबत जम्मू-कश्मीरमध्ये युतीची चर्चा होऊ शकते, तर मग या विद्यार्थ्यांशी चर्चा का नाही? तुमची देशभक्ती 15 मिनटात बहुसंख्याकांचे गळे कापणाऱ्या आणि अफझल गुरूच्या फाशीला विरोध करणाऱ्या पक्षांवर का लागू होत नाही? मतांच्या ध्रुवीकरणासाठी अशांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल होत नाहीत का?” असे म्हणत आदित्य ठाकरेंनी मोदी सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
“जर आपल्याला फसवणाऱ्या आणि आपल्या विरोधात दहशतवादी कारवाया करणाऱ्यांशी आपण चर्चा करु शकतो, तर मग अपल्यातीलच लोकांशी चहावर चर्चा करून त्यांना योग्य मार्गदर्शन का करत नाही आहोत?” असा सवाल विचारत आदित्य ठाकरेंनी कन्हैयासह देशातील विद्यार्थ्यांच्या बाजू घेतली आहे.
“…मग महिलांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई का नाही?”
“देशाला भारतमाता मानता, मग महिलांचा अपमान करणाऱ्यांवर का नाही? देशद्रोहाचा गुन्हा दाखल का होत नाही? महाराष्ट्रात एका राष्ट्रीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने महिलेला तिच्या व्हिर्जीनिटीबाबत विचारून, तिचा विनयभंग केला. त्याच्यावर फक्त निलंबनाची कारवाई करण्यात आली. का नाही अशा विकृत मानसिकतेच्या माणसावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला?” असा सवाल करत आदित्य ठाकरेंनी गणेश पांडे प्रकरणावरुन भाजपवर हल्लाबोल केला.
“ही सोयीची देशभक्ती आहे”
आदित्य यांनी भाजपच्या देशभक्तीला सोयीची देशभक्ती असे म्हटले आहे. आदित्य म्हणाले, “हे सरकार देशद्रोहाचा गुन्हा हा काय फक्त विरोधीपक्षातील लोकांसाठीच वापरणार आहे का? ही सोयीची देशभक्ती आहे, जी फक्त सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्यांवर लादली जाते आहे. आपण असंतोषातून नवीन व्यक्तिमत्वांना जन्म का घालतोय?”
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement