एक्स्प्लोर
कोकण मंडळातर्फे 9018 घरांची लॉटरी, 18 जुलैपासून अर्ज भरा!
यासाठी 18 जुलैपासून अर्ज नोंदणीला सुरुवात होणार आहे. अर्जांची संगणकीय सोडत वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या म्हाडाच्या मुख्यालयात 19 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी दहा वाजता काढण्यात येणार आहे.
मुंबई : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) घटक असलेल्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे परवडणाऱ्या घरांची राज्यात सर्वात मोठी म्हणजेच नऊ हजार अठरा सदनिकांची विक्रमी सोडत जाहीर करण्यात आली आहे.
यासाठी 18 जुलैपासून अर्ज नोंदणीला सुरुवात होणार आहे. अर्जांची संगणकीय सोडत वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या म्हाडाच्या मुख्यालयात 19 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी दहा वाजता काढण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी विजय लहाने यांनी दिली.
सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शिरढोण (ता. कल्याण) येथील 1905, खोणी (ता. कल्याण ) येथील 2032 इतक्या अत्यल्प गटातील सदनिकांचा समावेश आहे. या सदनिकांसाठी भारतात कुठेही स्वमालकीचे घर नसलेला, मात्र एमएमआरने अधिसूचित केलेल्या सर्व क्षेत्रातील नागरिकच अर्ज करु शकतात. या योजनेतील घरांसाठी अर्जदाराचे कौटुंबीक वार्षिक उत्पन्न तीन लाख इतके मर्यादित आहे.
अर्ज कसा कराल?
या सोडतीची माहितीपुस्तिका आणि ऑनलाईन अर्ज म्हाडाच्या htpps://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याच संकेतस्थळावर अर्जदारांची नोंदणी 18 जुलैला दुपारी दोन वाजल्यापासून ते आठ ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजेपर्यंत सुरु राहिल.
कोकण मंडळातर्फे यंदा प्रथमच अर्जदारांना NEFT / RTGS द्वारे अनामत रक्कम भरण्याचा पर्याय देण्यात आला आहे. त्याचबरोबर डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड , इंटरनेट बँकिंगद्वारे अनामत रक्कम भरता येणार आहे.
गटनिहाय मर्यादा
या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटाकरिताच्या सदनिकांचा समावेश आहे. अत्यल्प उत्पन्न गटाकरिता 2017-18 या आर्थिक वर्षातील अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबीक उत्पन्न (पती + पत्नी यांचे एकत्रित उत्पन्न) 25 हजार रुपयांपर्यंत असणं गरजेचं आहे.
अल्प उत्पन्न गटासाठी 25001 ते 50 हजार रुपयांपर्यंत आणि मध्यम उत्पन्न गटासाठी 50001 ते 75 हजार रुपयांपर्यंत, उच्च उत्पन्न गटासाठी अर्जदाराचं 75 हजार ते त्यापेक्षा जास्त सरासरी मासिक कौटुंबीक उत्पन्न असणं आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम (परतावा) + अर्ज शुल्क (विना परतावा) अत्यल्प उत्पन्न गटासाठी 5448 प्रति अर्ज, अल्प उत्पन्न गटासाठी 10 हजार 448 रुपये प्रति अर्ज, मध्यम उत्पन्न गटासाठी 15 हजार 448 प्रति अर्ज, उच्च उत्पन्न गटासाठी 20 हजार 448 प्रति अर्ज आकारली जाणार आहे. यामध्ये ऑनलाईन अर्जापोटी प्रतिअर्ज 448 (विना परतावा) अर्ज शुल्काचा समावेश आहे.
कोणत्या भागात किती घरं?
यंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी मीरा रोड, बाळकूम ठाणे, शिरढोण (ता. कल्याण), खोणी (ता. कल्याण), मौजे अंतर्ली, खोणी हेदुटने, कोले (ता. कल्याण), मौजे उंबार्ली (ता. अंबरनाथ) येथील एकूण 4455 सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.
अल्प उत्पन्न गटासाठी मीरा रोड, कावेसर ठाणे, वेंगुर्ला सिंधुदुर्ग, विरार बोळींज, खोणी (ता. कल्याण), मौजे अंतर्ली, खोणी हेदुटने, कोले (ता. कल्याण), मौजे उंबार्ली (ता. अंबरनाथ) येथील 4341 सदनिकांचा समावेश आहे.
मध्यम उत्पन्न गटाकसाठी बाळकूम (ठाणे), वेंगुर्ला (सिंधुदुर्ग), मीरा रोड, कुंवर बाव (रत्नागिरी), विरार बोळींज येथील एकूण 215 सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.
उच्च उत्पन्न गटाकरिता वेंगुर्ला (सिंधुदुर्ग), मीरा रोड, कुंवर बाव (रत्नागिरी) येथील एकूण सात सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.
सदनिकांच्या वितरणासाठी कोणालाही म्हाडाने प्रतिनिधी, सल्लागार आणि प्रॉपर्टी एजन्ट म्हणून नेमलेलं नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये. तसे केल्यास कोकण मंडळ / म्हाडा कोणत्याही व्यवहारास / फसवणुकीस जबाबदार राहणार नाही, असंही आवाहन करण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement