एक्स्प्लोर
मुंबईत जाहिरात क्षेत्रात कार्यरत 30 वर्षीय तरुणीची आत्महत्या
भूमिका 'वर्ल्डवाईड कम्युनिकेशन ग्रुप डीडीबी मुद्रा ग्रुप'मध्ये कार्यरत होती. तिचे पती विनय सिंगसुद्धा याच कंपनीत कार्यरत आहेत.

मुंबई : मुंबईत 30 वर्षीय तरुणीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. भूमिका सिंगने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. भूमिका जाहिरात क्षेत्रात कार्यरत होती. वाकोल्यातील राहत्या घरी भूमिकाने गळफास घेतला. तिच्या आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. यासंदर्भात वाकोला पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भूमिका 'वर्ल्डवाईड कम्युनिकेशन ग्रुप डीडीबी मुद्रा ग्रुप'मध्ये कार्यरत होती. तिचे पती विनय सिंगसुद्धा याच कंपनीत कार्यरत आहेत. घटनास्थळी सुसाईड नोट सापडली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
आणखी वाचा























