एक्स्प्लोर

क्रिकेटमध्ये करिअर करता न आल्याने मुंबईतील क्रिकेटरची आत्महत्या!

कोरोनामुळे करिअरमध्ये आयपीएल किंवा मोठ्या मॅचमध्ये खेळायची संधी हुकल्याने मानसिक तणावातून करण तिवारीने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुंबई : क्रिकेटमध्ये करिअर करता आले नाही म्हणून मुंबईत एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. करण तिवारी असं या क्रिकेटपटूचं नाव असून त्याने मुंबई उपनगरातील मालाड पूर्वेमधल्या राहत्या घरी सोमवारी (10 ऑगस्ट) गळफास घेतला. तणावातून त्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. कोणतीही सुसाईड नोट त्याच्याकडे सापडलेली नाही. कुरार पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

मालाडमध्ये करण तिवारी आपल्या आई आणि भावासोबत राहत होता. कोरोनामुळे करिअरमध्ये आयपीएल किंवा मोठ्या मॅचमध्ये खेळायची संधी हुकल्याने करण तिवारीने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या तरुणाने शेवटचा फोन राजस्थानमध्ये असलेल्या आपल्या मित्राला केला होता. मी मानसिक तणावात असून मी आत्महत्या करत असल्याचं त्याने मित्राला सांगितलं. यानंतर मित्राने तातडीने याची माहिती राजस्थानमध्येच राहत असलेल्या करणच्या बहिणीला दिली. हे कळताच करणच्या बहिणीने सबंध प्रकार आईला सांगितला. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

रात्रीच्या जेवणानंतर करण तिवारी साडेदहाच्या सुमारास त्याच्या खोलीत गेला आणि दरवाजा बंद करुन घेतला. करण दरवाजा उघड नाही म्हणून लॉक तोडण्यात आलं. त्यावेळी करणचा मृतदेह समोर दिसला. दरम्यान पुढील तपास कुरार पोलिस करत आहेत.

करणचा मित्र जितू वर्माच्या माहितीनुसार, "क्रिकेट खेळण्यासाठी त्याची धडपड सुरु होती." तर "मी त्याच्यासाठी चांगला स्थानिक क्लब शोधण्याचा प्रयत्न करत होतो," असं मुंबई सीनिअर संघाचे प्रशिक्षक विनायक सामंत यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Maharashtra Live News Updates:वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Live News Updates: वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
Mumbai Hotel Food Prices : मुंबईत खाणं महागणार! हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे दर 10 ते 15 टक्क्यांनी वाढणार; 'आहार' संघटनेचा निर्णय
मुंबईत खाणं महागणार! हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे दर 10 ते 15 टक्क्यांनी वाढणार; 'आहार' संघटनेचा निर्णय

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
Embed widget