एक्स्प्लोर

नियम मोडणाऱ्या, कचरा करणाऱ्या मुंबईकरांवर 10 हजार कॅमेरांची नजर

कुणाच्या नकळत अगदी गुपचूप रस्त्याच्या कडेला कचरा टाकत असाल, डेब्रीजचा डंपर रिकामा करत असाल, नाल्यात कचरा फेकत असाल, तर सावध व्हा. कारण, तुमच्यावर बिग बॉसची नजर असणार आहे.

मुंबई : मुंबईकरांनो, आता मुंबईत कोणताही नियम मोडताना दहा वेळा विचार करा. कारण मुंबईतल्या रस्त्यांवर आता कुठेही साधा कचरा जरी टाकला तरी तुमच्यावर करडी नजर ठेवली जाणार आहे. मुंबई स्वच्छ आणि दुर्घटनामुक्त करण्याच्या दृष्टीने मुंबई महापालिका 500 ठिकाणी सीसीटीव्ही बसवणार आहे. तर, राज्य सरकारही निर्भया फंडातून वाढीव पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावणार आहे.

कुणाच्या नकळत अगदी गुपचूप रस्त्याच्या कडेला कचरा टाकत असाल, डेब्रीजचा डंपर रिकामा करत असाल, नाल्यात कचरा फेकत असाल, तर सावध व्हा. कारण, तुमच्यावर बिग बॉसची नजर असणार आहे.

मुंबईभर मुंबई पोलिसांचे पाच हजार डोळे सिसीटीव्हीच्या रुपाने सध्या मुंबईवर नजर ठेऊन आहेत. पण, हे पाच हजार डोळे मुंबईतल्या प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवायला अपुरे पडत आहेत. त्यासाठी आता वाढीव साडेपाच हजार सिसीटीव्ही सज्ज होणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांवर 10 हजार 500 कॅमेरांची नजर असणार आहे. केंद्र सरकारच्या निर्भया फंडातून 5 हजार तर मुंबई महापालिकेच्या खर्चातून 500 सिसीटीव्ही शहरात बसवले जाणार आहेत.

मुंबई पोलिसांकडून बसवले जाणारे सीसीटीव्ही हे गुन्हेगारी आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. त्याचा फारसा उपयोग मुंबई महापालिकेला होत नाही. त्यामुळेच आता मुंबई महापालिकेकडून इस्त्रायलच्या धर्तीवर व्हिडीओ अॅनालिटिक्स टूल हे आधुनिक तंत्र असणारे सिसीटीव्ही बसवले जाणार आहेत.

व्हिडीओ अॅनालिटिक्स टूल म्हणजे काय? या टूलद्वारे (कॅमेराद्वारे) झाड कोसळणे, इमारत पडणे, आग लागणे, पूरस्थिती निर्माण होणे, अवैधरित्या रस्ते-नाल्यांमध्ये कचरा आणि डेब्रीज टाकणे, चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाल्यास या घटनांचे तात्काळ नोटीफिकेशन पालिकेच्या आपत्कालीन कक्षाला प्राप्त होतील. परिणामी संबंधित यंत्रणांना लगेच कळवले जाईल.

मुंबईच्या आप्तकालीन नियंत्रण कक्षाने शहरातील अशी काही ठिकाणं निवडली आहेत, ज्या ठिकाणी वारंवार डेब्रिज किंवा कचरा टाकला जातो. तसेच पावसाळ्यात नेहमी पाणी साचणाऱ्या ठिकाणांचीही यात निवड करण्यात आली आहे. यामुळे मुंबई स्वच्छ आणि दुर्घटनामुक्त ठेवण्यासाठी या 500 सीसीटीव्हींची मदत मुंबई महापालिका प्रशासनाला होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
आता भाजपची राजवट जाणार! भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, तरुणांची इतकी भीती का वाटतेय?
आता भाजपची राजवट जाणार! भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, तरुणांची इतकी भीती का वाटतेय?
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget