एक्स्प्लोर
उद्या मध्य रेल्वेचा 10 तासांचा विशेष मेगाब्लॉक

मुंबई: मुंबईत उद्या मध्य रेल्वेवर 10 तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. या दहा तासांच्या मेगा ब्लॉकदरम्यान सीएसटी-कल्याण नवीन जलद लाईनचं काम केलं जाणार असल्याने मध्य मार्गावरील लोकलसह अनेक एक्स्प्रेसही रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दिवा स्थानकात लोकल लाईनच्या कट-कनेक्शन कामांसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे सीएसटी ते कल्याणपर्यंत नवीन जलद लाईन उपलब्ध होणार आहे. या ब्लॉकमुळे लोकल सेवांवर परिणाम होणार असल्यानं कोयना, सिंहगड, प्रगती, गोदावरी अशा 10 मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय लोकांची गैरसोय पाहता, इतर लोकल गाड्यांनी विशिष्ठ ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत दरम्यान, यापुढच्या काही दिवसात दर पंधरा दिवसांनी असे मोठे ब्लॉक घेण्याचं रेल्वेनं नियोजन केलं आहे. याच धर्तीवर उद्या 10 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार असून आवश्यकता नसल्यास नागरिकांनी प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Before You Go
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप

नरेंद्र बंडबे
Opinion




















