Mumbai Crime News : मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील मशिदींमधून रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरएके मार्ग पोलिसांनी ही कावाई केली आहे. हुसेन आसिफ साजिद हुसैन सय्यद असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सय्यद हा आपल्या आईसोबत कल्याण येथे राहतो. त्याने चेंबूर, धारावी, विक्रोळी, घाटकोपर, पनवेल, खोपोली आणि ठाण्यातील वर्तक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक मशिदींमध्ये चोरी केली होती. आरएके मार्ग पोलिसांना तो गेल्या अनेक दिवसांपासून हवा होता. परंतु, सतत तो गुंगारा देत होता. अखेर आज त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद हा 1999 पासून मशिदींमधून दानपेट्या आणि इतर मौल्यवान वस्तू चोरत होता. त्याची पार्श्वभूमी देखील गुन्हेगारी स्वरूपाची आहे. शिवडी येथील मशिदींमध्ये चोरीच्या दोन घटना घडल्यानंतर आरएके मार्ग पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. ज्या मशिदींमध्ये चोरी झाली होती त्या मशिदींच्या शेजारील सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर सय्यद याच्यवर संशय बळावला. यावेळी सय्यद याच्याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी त्याने चोरी केल्याची कबुली दिली.
पोलीस त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतानाच बुधवारी पहाटे शिवडी येथील नॅशनल मार्केटजवळील मशिदीतून तिसरा चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गाडेकर यांना मिळाली. दानपेटी व मोबाईल चोरताना एका संशयिताला रंगेहात पकडण्यात आले. पथकाने त्याच्याकडून चोरीच्या मौल्यवान वस्तू एक दुचाकी जप्त केली.
"नोकरीसाठी पात्र नसल्यामुळे तो चोरीसारखे गुन्हे करू लागला. मशिदींमधून चोरी करण्याची ही पद्धत सोपी वाटल्यामुळे त्याने ती चालू ठेवली, अशी कबुली साईदने दिल्याची माहिती एका अधिकाऱ्याने सांगितले.
महत्वाच्या बातम्या